अर्धापूर| येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथमतः उपस्थित मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर उपस्थितांनी आपल्या भाषणातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. शोषित, पीडित समाजाच्या न्याय हक्कासाठी हातात तलवार घेऊन लढाई करणार्या राजमाता अहिल्यादेवी ह्या प्रथम महीला आहेत. इंग्रजाविरुध्द जाहीर बंड करून सतीप्रथा बंद करण्यात अहिल्याबाईचे मोठे योगदान आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच समाजाने मार्गक्रमण केले तर निश्चितच समाजाचे भवितव्य उज्ज्वल होईल असे मौलिक प्रतिपादन पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी याप्रसंगी केले.
बस स्थानक परिसरातील खंडोबा मंदिर परिसरात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यातआले व शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक जाधव,नगराध्यक्ष छत्रपती कानोडे ,नगरसेवक राजेश्वर शेटे, जिल्हा सचीव निळकंठराव मदने, व्यंकटराव साखरे,सोनाजी सरोदे,नवनाथ बारसे, अजिंक्य काकडे अक्षय काकडे,पप्पू साखरे, अजिंक्य काकडे,यांच्यासह अनेक समाज बांधव ,व ग्रामस्थ उपस्थित होते.
एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी त्यांचे नाव लिहिले गेले आहे. अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र वाचल्यानंतर स्त्री शक्ती किती महान आहे, ती आपल्या आयुष्यात काय करू शकते याचे उदाहरण आपल्याला मिळेल. जीवनात कितीही संकटे आली तरी त्यांना कसे सामोरे जायचे हे अहिल्याबाईंच्या जीवनातून शिकले पाहिजे. अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संकटांचा सामना केला पण त्यांनी कधीच हार मानली नाही.यावेळी आदिंची उपस्थिती होती.