श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांचा अनोखा उपक्रम..
नांदेड। श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महामानवाच्या जयंतीच्या निमित्ताने सतत वेगवेगळे उपक्रम राबवत असते या वेळेस हिंदु कुलभूषण महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर व बिलोली चे नायब तहसीलदार रघुनाथ सिंह चौव्हाण यांच्या संकल्पनेतून "बेटी बचाव बेटी पढाव" मुलींचे नाव असलेले नामफलक सर्वांना वितरण करून व अन्नदान वाटप करून श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने अनोखा उपक्रम राबवला,या ऊपकमाचे समाज बांधवांनी अभिनंदन केले.
महाराणा प्रतापसिंह महाराज यांच्या जयंतीनिमित्त २ जुंन रोजी हजारोंचा जनसमुदाय होता. यावेळी या ऊपकमा अंतर्गत बेटी बचाव बेटी पढाव मुलीचे नामफलक वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष दुर्गासिंह ठाकुर, युवा जिल्हाध्यक्ष संदीप सिंह गौर, शहराध्यक्ष महेश ठाकूर, जिल्हा सचिव अंकित तेहरा, सारंग परिहार, दिलीप सिंह ठाकुर, महिला करणी सेना मराठवाडा प्रसिद्धीप्रमुख पूजा बिसेन, जिल्हाध्यक्ष सुनिता चौव्हाण, उपाध्यक्ष मीनाक्षी हजारी, शहराध्यक्षा रंजिता चौव्हाण, जिल्हा प्रशिद्धी प्रमुख मंगला वर्मा, निर्मला चौव्हाण, जिल्हा सचिव अंबिका तेहरा, उषा ठाकूर, नंदा चौव्हाण, शोभा चंदेल, दर्शना गहेरवार, योगिता चौव्हाण, पायल ठाकूर, गीता शंकर सिंह ठाकूर, मीना चौव्हाण, किरण गहलोत, फुलाबाई ठाकूर, बबिता ठाकूर,शोभा चंदेल, पलक चंदेल, छाया सोळंके व राणी सोळंके आदीजण उपस्थित होते. करणी सेनेने केलेल्या या ऊपकमाचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.