हिमायतनगरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने विषमुक्त शेतीचा संदेश -NNL

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाकडून एलएडीद्वारे जनजागृती 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
येथील ओमशांती केंद्र तथा प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने विषमुक्त शेतीचा संदेश देत एलएडीद्वारे जनजागृती करण्यात आली असून, अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरणासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या जनजगृती रथाचे भूमिपूजन हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.


आजादी का अमृत महोत्सव से स्वर्णीम भारत कि और ... या माध्यमातून हिमायतनगर शहर व तालुका परिसरात विविध प्रकारचे उपक्रम शिबीर राबवून जनजागृती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज सशक्त भारत निर्मितीसाठी दि.०५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारी शाश्वत यौगिक शेती म्हणजेच विषमुक्त शेती पद्धतीने जमीन कसणे  फायद्याचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा आणि तणनाशकाचा होत असलेला भरमसाठ वापर थांबवावा. जेणेकरून पर्यावरणाचा होणार र्हास थांबेल, आणि शेतकऱ्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम थांबतील. 


कारण विषमुक्त अण्णा खाऊन मोठ्या प्रमाणात नागरिक आजारी पडत आहेत. जसे कि कैन्सर, मधुमेह, रक्तदाब, यकृत व हृदय विकारासारख्या आजाराला बाली पडत आहेत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांनी भारतीय प्राचीन शेतीपद्धतीचा स्वीकार करणे आवश्यक आहे.ईश्वरीय शक्ती आणि निसर्गाची शक्ती या दोन्हीचा वापर करून शाश्वत पद्दाथीने शेती केली तर आपला शेतकरी बंधू पुन्हा आत्मनिर्भर, व्यसनमुक्त, अंधश्रद्धामुक्त, होऊन कर्तव्याप्रती जागृत व जबाबदार होईल. यासाठी शेतकऱ्यांनी विषमुक्त शेतीकडे वळावे असे आवाहन आ.माधवराव पाटील जवळगावकर, पोलीस निरीक्षक भुसनर, पोलीस उपनिरीक्षक बालाजी महाजन, ब्रह्मकुमारी सिंधू दीदी, आदींनी एलईडी प्रोजेक्टरवरून शेतकऱ्यांना विषमुक्त शेतीबाबत करण्यात आलेल्या जनजागृती प्रसंगी बोलताना केले. 

यावेळी वृक्षारोपण करून वृक्ष जागविण्याचा आणि विषमुक्त शेती करण्याचा उपस्थितांनी संकल्प केला. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने ग्रामीण भागात एलईडी प्रोजेक्टरद्वार तालुक्यातील ८ ते १० गावात रथयात्रा काढून शेतकऱ्यांना विषमुक्ती शेतीचे महत्व पटवून दिले जात आहे. या जनजागृतीचा शेतकऱ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळत असल्याची माहिती शीतल दीदी यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना दिली. यावेळी नागरिक, पोलीस अधिकारी, कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी