नांदेड| महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लिंबगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मनसे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांच्या पुढाकारातून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरोग्य शिबीरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या महाआरोग्य शिबीरात तब्बल अडीच हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली.
मनसे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचे उदघाटन माजी आ. डी. आर. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात डॉ.मनोज मोरे, डॉ. गजानन माने, डॉ. सोनिया उमरेकर, डॉ. राजेश्वर पवार, डॉ. दत्ता मोरे, डॉ. अनिल देवसरकर, डॉ. मयुरी धुत, डॉ. स्नेहल जाधव, डॉ. शरद माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. डवले आदीं नेत्ररोग, हृदयरोग, अस्थीरोग, स्त्रीरोग, पोट विकार, कान, नाक, घसा, न्यूरो आदी जवळपास तीस नांदेडमधील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आजाराचे निदान व उपचार केले.
नांदेडमध्ये प्रथमताच मराठवाडा स्तरावर आयोजित केल्याने अनेक गरजु रुग्णांनी समाधान व्यक्त केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे, सोपान कदम, योगेश कदम, विष्णु सावळे, अमोल चौभारकर, गंगाराम वैद्य, दत्ता पावडे, देविदास पंडीलवाड आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले.