किनवट। आज दिनांक 15 जून 2022 रोज बुधवार सकाळी ठिक 10:00 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा सावरगाव येथे शाळापूर्व तयारी मेळावा व नवीन पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव घेण्यात आला.
सकाळी गावात वातावरण निर्मितीसाठी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर नवीन प्रवेशपात्र विद्यार्थी व त्यांचे पालकांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेत पहिले पाऊल अंतर्गत प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. सर्व प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांची वेगवेगळ्या टेबलावर चाचणी घेण्यात आली व त्यांना इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य श्री. माधव पुंजाजी डोखळे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. संजयजी कराड साहेब, ग्रामसेवक श्री. कपिल कदम साहेब, पोलिस पाटील श्री. संतोष फर्रास, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. शेषराव पाटील अनंतवार, शा.व्य. समिती अध्यक्ष श्री. शैलेंद्र कल्याणपाड, शाळा मुख्याध्यापक श्री. किशोर कावळे सर, सहशिक्षक श्री. रामराव अनंतवार सर,अंगणवाडी सेविका श्रीमती. रमाबाई सरोदे, श्रीमती. वाघमारे मॅडम,श्री. भागवत दराडे व गावतील बहुसंख्य नागरिक व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.