नारायणा इंग्लिश स्कुल वर तात्काळ कार्यवाही करुन कलम ४२०नुसार फसवणूकीचे गुन्हे दाखल करा या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा बांगडी मोर्चा
नांदेड| नांदेड शहरामध्ये मान्यता नसलेल्या नारायणा इंग्लिश स्कुल वर तात्काळ कार्यवाही करुन कलम ४२० नुसार फसवणूकीचे गुन्हे दाखल करा या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील कदम यांच्या नेतृत्वात बांगडी मोर्चा काढण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे सुनील पा.कदम यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागास दिनांक 2/5/2022 17/05/2022 पर्यत अनेकवेळा तक्रार देवुनही शिक्षण विभाग जागा होत नाही म्हणून मोर्चा करण्याचे ठरवले होते तद्नंतर आजपर्यंत सदरील प्रकरणी कोणतीही कार्यवाही केलेली नसल्या करणाने व याचाच अर्थ आपण कारवाई करण्यास धजत नाहीत किंवा संबंधित संस्थाचालकाशी संगणमत करुन त्यांना पाठीशी घालण्याचा डाव खेळत आहेत.
आणि कारवाईस विलंब करत आहेत तत्पूर्वी 26/05/2022 रोजी दिलेल्या निवेदना नंतर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार सदरील प्रकरणी एक कमिटी स्थापन करण्यात आली. त्यामुळे तूर्तास सदरील भव्य बांगडी मोर्चा स्थगित केला या स्थापन झालेल्या कमिटीचा कुठलाही अहवाल आपल्याला दिला नसून केवळ वेळ मारुन नेण्याचं काम केले जात आहे. असेही सुनिल पाटील कदम म्हणाले. तत्कालीन कमिटीत लोहा पंचायत समितीचे विद्यमान गटविकास अधिकारी रविंद्र सोनटक्के,प्रभारी गटशिक्षणाधिकारी रुस्तम आडे,शिक्षण विस्तार अधिकारी के.के.मेकाले यांचा समावेश होता याचा कसलाही अहवाल प्राप्त न झाल्याने दि.०९ जून २०२२ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार पुर्ववत भव्य बांगडी मोर्चा हा १३ जून २०२२ रोजी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुनिल पा.कदम यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून ते जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागापर्यत बांगडी मोर्चा काढण्यात आला.
यावेळी मोर्चेकऱ्यांनी "नारायणा शाळेवर तात्काळ कारवाई करा" "शिक्षणाधिकारी यांचा जाहीर निषेध" "नारायण शाळेवर कारवाई करा अन्यथा आमच्या बांगड्या भरा" अशा घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून टाकला. यावेळी आंदोलन कर्ते हे ढोल ताशा वाजवत व जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांचे निवेदन घेऊन जि.प. शिक्षण विभागाकडे रवाना झाले यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी हे आपल्या मागण्या अनेक दिवसापासून अनेक निवेदन देऊन सुद्धा मान्य होत नसल्यामुळे आपण कार्यक्षम आहात व आमचा बांगड्यांचा आहेर स्विकारा यावर ठाम होते.
यावेळी जि.प.चे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी शिक्षण विभाग प्राथमिक व शिक्षण विभाग माध्यमिक या दोन्ही शिक्षणाधिका-यांना परिस्थितीचा आढावा घेऊन प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे मॅडम यांना संबंधित नारायणा ई टेक्नो शाळेवर येत्या दोन दिवसांत पोलीस स्टेशन भाग्यनगर यांना बोगस शाळा आहे. असे लेखी पाठवून त्यांच्यावर शासकीय कारवाई करा असे आदेश दिले व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी नारायणा शाळेला पाठीशी घालणाऱ्या वेलिंग्टन शाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्याचे आदेश हे लातूर विभागीय उपसंचालका कडे पाठवून द्यावे असे आदेश दिले. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना दोन दिवसात सदरील प्रकरणी कारवाई होईल असे आश्वासन देऊन अतिरिक्त कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे साहेब यांनी निवेदन स्वीकारले.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणामुळे व खाबूगिरीमुळे शिक्षण विभाग मल्लीन होत चालला आहे व नांदेड शहरात अशा बोगस शाळा उदयास येत आहे नारायणा सारख्या बोगस शाळा अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन बोगसगिरीचा विक्रम केला आहे बोळ्या भाबड्या आंध्रप्रदेशातील हैद्राबादच्या शिक्षण पध्दतीचा अमिष दाखवून शासन नियम धाब्यावर बसवून पालकांची फसवणूक होत असल्याचे निर्दशनास येत असल्याने स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने संविधानिक मोर्चाचे हत्यार उपसले आहे. प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या नाकर्तेपणामुळे संबंधित अधिका-यांची विभागाबाहेर बदली होईल का याकडे पालकांचे लक्ष वेधले आहे.
यावेळी उपस्थित स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता डॉ.बालाजी पेनुरकर, मराठवाडा संघटक जनार्धन वडवळे, जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील कदम, जिल्हाध्यक्ष तिरुपती पाटील भगणुरे, जिल्हाध्यक्ष वि.आ. शैलेश पाटील,जिल्हाउपाध्यक्ष महेश जाधव,जिल्हासचिव शुभम पावडे ,जिल्हासचिव राज पाटील शिंदे, मा.वि.आ. जिल्हाध्यक्ष सदानंद पाटील पुयड,तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड, ओमकार पाटील शिंदे, बळीराम पाटील कदम, गोपाळ पाटील कदम, अंकुश पाटील कोल्हे, मारोती पाटील कानोले, नागेश पाटील मोरे, ओम पाटील ढगे, सोनू पाटील शिंदे, मदन पाटील पाथरडकर,जगन्नाथ पाटील सुके,विष्णु पाटील खराटे,भास्कर पाटील शिंदे व असंख्य स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे आजचा बांगडी मोर्चा हा संविधानिक पद्धतीने होता येणाऱ्या काळात नारायणा शाळेवर तात्काळ कारवाई झाली नाही तर स्वाभिमानी स्टाईलने शिक्षण विभागास धडा शिकविण्यात येईल असा आक्रमक पवित्रा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम यांनी घेतला व येणार्या काळातील आंदोलने ही उग्र स्वरूपाची असतील असा इशारा दिला.