येणा-या भविष्यकाळात या कंपनी द्वरे शेतकऱ्यांना फायदा - आ माधवराव पा.जवळगावकर -NNL


हदगाव, शे.चांदपाशा|
येणाऱ्या भविष्य काळात हदगांव तालुक्यातील ह्या कंपनीद्वरे शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेलेल्या मालाचा फायदा होईल. अशी अपेक्षा हदगाव विधानसभा क्षेञाचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी शहरातील सुमन लाँन्स मध्ये शनीवारी आयोजित केलेल्या एम. व्हि. पी. ग्राम उद्योजक विकास परिषद मध्ये बोलतांना व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश शेलार (एम.सी.एल इंडीया) हे होते प्रमुख पाहुणे म्हणून कृषि आयुक्त धिरज कुमार म्हणुन होते. यावेळी आ माधवराव पाटील जवळगावकर पुढे म्हणाले की, तालुक्यातील शेतकरी फार अर्थिक आडचणीत असुन, बोगस बियाणेच्या बाबतीत कडक धोरण कृषि विभागाने अवलंबून शेतक-याचे होणारे नुकसान टाळवे. अशी सुचना करुन ते पुढे म्हणाले की, माझी खुप दिवसापासून इच्छा होती. तालुक्यात शेतक-याच्या हिताचे व स्थानिक युवकांना रोजगार मिळावा आता या माध्यमातून निश्चितच रोजगार मिळेल अशी आशा व्यक्त केली. सध्या शेती करणे बेभरवश्याची झालेली आहे शेती पेरणी ते लागवडी पर्यत अफाट खर्च अन् उत्पादन कमी त्यातच शेतक-याला बाजारपेठ मिळत नसल्याने अशा परिस्थितीत शेती व्यवसायला जोडधंदा देण्याची आवश्यकता आहे.

या उद्देशाने स्थानिक स्तरावर प्रमाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी नमुद केले. या प्रकल्प मध्ये आता पर्यत १५ हजार शेतकरी जोडले गेले असुन, कंपनीने हदगाव शहराजवळ जागा पण घेतलेली आहे. अशी माहीती आमदार जवळगावकर यांनी दिली. यावेळी कृषि आयुक्त धिरज कुमार यांचे पण मार्गदर्शनपर भाषण झाली. नादेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पण यावेळी शेतक-यानी जास्तीत जास्त शेतकऱ्यानी विमा काढण्याचे अहवान केले. शेवटी कार्यक्रमाचे प्रयोंजक सतिष पाटील यांनी अभार माणले.

कृषि आयुक्तानी वेळ दिला नाही... हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बोगस बियाणेच्या खताच्या बाबतीत नेमक्या काय समस्या आहेत. या करिता शेतक-याना कृषि आयुक्त यांनी वेळ दियायला हवा होता. हदगाव तालुका व्यतिरिक्त अर्धापुर तालुक्याचे पण शेतकृरी आपल्या समस्या घेवून आले होते. पण कृषि आयुक्त  कार्यक्रम संपताच  निघुन गेले यावेळी त्यानी पञकारांना पण भेटायच टाळल. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी