नविन नांदेड। सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता कर थकबाकी पोटी २४ जुनं रोजी दोन मालमत्ता सिल करण्यात आल्या तर एका मालमत्ता धारकाने थकबाकी पोटी नगदी रक्कम भरल्याने पथकाने कार्यवाही केली नाही, झोन अंतर्गत मालमत्ता धारकांनी मालमत्ता करापोटी थकबाकी भरून मनपा प्रशासास सहकार्य करण्याचे आवाहन क्षेत्रिय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त डॉ. रईसोधदीन यांनी केले आहे.
मनपा प्रशासनाने मालमत्ता करापोटी थकबाकी असलेल्या मालमत्ता करापोटी थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांपोटी सिडको झोन कार्यालय अंतर्गत मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम , उप आयुक्त तथा मुल्य निर्धारक व कर संकलन अधिकारी सुंकेवार यांच्या मार्गदर्शनाखाली झोन क्र,६ सिडको अंतर्गत सहा. आयुक्त डॉ रईसअसोदिन यांचे अधिनस्त पथकाने मालमत्ता करापोटी दोन मालमत्ता सिल केल्या असून या कार्यवाही मुळे थकबाकी मालमत्ता धारकात खळबळ उडाली आहे.
सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता क्रमाक ४०५१ ०००८८९ या मालमत्ताधारक याच्याकडे ३१३८५ थकबाकी रक्कम मालमत्ता कर येणे बाकी असल्याने जप्ती करण्यात आली आहे एक.मालमत्ता धारक यांची रक्कम रुपये-इतकी येणे बाकी होती जप्ती करण्यात आली आहे तर मालमत्ता क्र ४०५१००१८६० यांच्या कडे ५७८९९ थकबाकी रक्कम असल्याने मालमत्ता सिल करण्यात आली. तर ४०५११०९८४६,व ४०६१००२०२३८ यांच्या कडे ९८२९१ रूपये रक्कम थकबाकी असल्याने पथकाने मालमत्ता सिल करण्यासाठी गेले असता नगदी रक्कम भरली आहे. सदरील कार्यवाही मध्ये कर निरीक्षक सुधिर सिंह बैस ,वसुली लिपीक मारुती सारंग नथुराम चौरे,दत्ता पानपट्टी , मारूती एनफळे, मारोती चव्हाण,यांनी कारवाई पार पाडली असुन थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरून सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ.रईसोधदीन यांनी केले आहे.