नविन नांदेड। सिडको परिसरात अचानक आलेल्या मुसळधार पाऊसाने अनेक भागातील घरावरील पत्रे उडून गेली. यामुळे नागरीक भयभयीत झाले असून, परिसरातील अनेक अंतर्गत भागात वृक्षे पडली तर मुख्य रस्त्यावरील अचानक वृक्ष कोसळल्याने दुचाकी वरील दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हि घटना दि.३१ मे रोजी दुपारी चार चा सुमारास घडली असून घटनास्थळी तात्काळ नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय चे सहाय्यक आयुक्त डॉ.रईसोधदीन यांनी अग्नी शामक दलाचा साह्याने वृक्ष काढून वाहतूक सुरळीत केली या आचनक आलेल्या पावसामुळे मात्र नागरीक महिला युवक व बालके भयभयीत झाले.
३१ मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे,विजेचा गडगडाट,व मुसाळधार गारांसह पाऊस आल्याने परिसरातील अनेक भागातील निवासस्थानी वरील कपडे, पत्रे व ईतर वस्तू ऊडुन गेले तर अंतर्गत भागातील अनेक ठिकाणचे वृक्ष उन्मळून पडली तर मुख्य रस्त्यावरील सिडको ते लातुर फाटा रोडवरील वंसतराव नाईक महाविद्यालय परिसरात असलेले जुनी ईमारत भागातील संरक्षक भिंती अंतर्गत भागातील मोठे वृक्ष उन्मळून रस्त्यात पडल्या ने दुचाकीवरील जाणाऱ्या दोन जणांना मार लागला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे तर सिडको ते नांदेड जाणारी येणारी वाहतूक विस्कळित झाली. सिडको कार्यालय लगत असलेल्या जिजामाता वसाहत येथे ही वृक्षाचा फांद्या वादळी वारे मुळे तुटून पडल्या आहेत.
नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय चे सहाय्यक आयुक्त डॉ.रईसोधदीन यांनी कार्यालय अधीक्षक विलास गजभारे, स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे यांच्या सह सफाई कामगार यांच्या सोबत पाहणी करून जुनी ईमारत वंसतराव नाईक महाविद्यालय सिडको परिसरातील मुख्य रस्त्यावरील उन्मळून पडलेले मोठे वृक्ष मनपाच्या अग्नी शामक दलाच्ये रईस पाशा व कर्मचारी यांच्या साह्याने व गुरूवार बाजार परिसरातील मनपा उधाण बगीचा मधील वृक्षे व अंतर्गत भागातील झाडे कटर मशिन सहायाने काढण्याचे काम तात्काळ सुरूवात केली असुन वाहतूक सुरळीत केली आहे.
मान्सुन पुर्व अचानक आलेल्या पावसामुळे प्रशासन व नागरीक यांच्यी धावपळ उडाली.लगत असलेल्या औधोगिक वसाहतीतील कारखाना परिसरातील अनेक भागात कारखाना परिसरात वादळी वारे व मुसळधार पावसामुळे वृक्षे उन्मळून पडली आहेत. ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस कर्मचारी यांच्यी नियुक्ती करुन वाहतूक सुरळीत केली. वृक्ष उन्मळून पडल्याने तिनं चाकी चार चाकी,व दुचाकी वाहनांची रस्त्यावरील नुकसान झाले आहे तर परिसरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठान यांच्ये नुकसान झाले आहे.