नांदेड। येथील छत्रपती व्यायाम व क्रिडा प्रसारक मंडळ नांदेड व नेताजी सुभाषचंद्र बोस कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय येथील क्रीडांगणावर करण्यात आले होते. सदरील शिबिरात लाठी काठी तलवार दांडपट्टा गदगा या शिवकालीन युद्ध व क्रिडा प्रकाराचे तंत्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. वस्ताद अतुल शिंदे हे प्रशिक्षक म्हणून लाभले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी मर्दानी क्रिडा प्रशिक्षण पुर्ण करुन आत्मसात केले. समारोप कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. सदरील कार्यक्रमाची प्रस्तावना छत्रपती व्यायाम व क्रिडा प्रसारक मंडळ नांदेड चे सचिव अमोल नलावडे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बिभीषण करे प्रमुख वक्ते इतिहास विभाग प्रमुख डॉ. संतोष कोटुरवार प्रमुख पाहुणे भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेचे संचालक एल.के. कुलकर्णी आणि भारतीय महिला शक्ति नांदेड जिल्हा सचिव डॉ. अर्चना भवनकर यांच्या हस्ते सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
शारीरिक शिक्षण विभागाच्या डॉ. सीमा अमोल नलावडे यांनी उपस्थित मान्यवर, पालक व विद्यार्थी यांचे आभार मानले. पालक प्रतिनिधी बालरोग तज्ञ डॉ.अशोक मोरे सौ.अर्चना मेटे यांनी तर विद्यार्थीनी प्रणाली फुलवले हिने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष शिंदे ,आनंद नादरे , प्रविण काळे ,रोहित नांदेडकर ,सज्जन कोचत यांनी परिश्रम घेतले.