नवीन नांदेड। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त नांदेड येथून भव्य मोटारसायकल रॅलीचा समारोप गोपाळचावडी येथे करण्यात आला, यावेळी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे ,व ग्रामपंचायत गोपाळ चावडी चा वतीने सरपंच व पदाधिकारी समाज बांधवांनी अभिवादन केले ,या वेळी जय मल्हार संघटनेच्या वतीने समाज बांधवांसाठी अन्नदान व्यवस्था केली होती.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी सकाळी नांदेड येथून निघालेल्या मोटारसायकल रॅलीत मोठया प्रमाणात समाज बांधव यांची उपस्थिती होती, नांदेड येथुन ही रॅली नांदेडच्या मुख्य मार्गाने रवीनगर कौठा येथे आल्यानंतर समाज बांधवांनी जोरदार पुष्पवृष्टी करून स्वागत केले, त्यानंतर ही सिडको मार्गे गोपाळचावडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे,जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे व सरपंच गिरजाबाई तुळशिराम डाखोरे , व माजी संरपच प्रतिनिधी संतोष बारसे, ग्रामपंचायत सदस्य व समाज बांधव , सामाजिक व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, पत्रकार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ,यावेळी युवा नेतृत्व गणेश काकडे, सचिन किसवे ,बबन वाघमारे, संतोष बारसे ,नवनाथ काकडे इंजि,नागेश काकडे ,देवानंद पुंडगिर, व्यंकट मोकले ,पांडुरंग आंबाटे ,खटके ,मेलगे व समाजबांधवांची उपस्थिती होती.
गोपाळ चावडी ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने पदाधिकारी व ग्रामस्थांनी पुतळा परिसरात ऊपसिथीत समाज बांधव व नागरीकांचे स्वागत केले. जुना कौठा येथे माजी नगरसेवक राजू गोरे यांच्या वतीने नांदेड येथून आलेल्या जयंतीनिमित्त काढलेल्या दुचाकी रॅली चे स्वागत करून पुष्पवृष्टी करण्यात आली, यावेळी टोपाजी काकडे, निळकंठ काळे, संजय काकडे, संतोष पुजारी,कृष्णा बारसे, बालाजी गोरे,पिटु गोरे यांच्या सह समाज बांधव ऊपसिथीत होते.