अर्धापूर, निळकंठ मदने। तालुका कार्यक्षेत्र असलेल्या अर्धापूर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत मुळे तर उपाध्यक्षपदी दिलीप मोटरवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
अर्धापूर बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडल्यानंतर मारूती मंदिरच्या सभागृहात अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.आध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत मुळें तर उपाध्यक्षपदसाठी दिलीप मोटरवार यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.त्यामुळे या दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जळके यांनी केली.
या विशेष बैठकीला माजी अध्यक्ष संचालक आर आर देशमुख, माजी उपाध्यक्ष संचालक बाबुराव सोळंके, संस्थापक अध्यक्ष राजू शेटे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, प्रवीण देशमुख व्यंकटी राऊत, सोनाजी सरोदे, शंकर वापटकर, प्रल्हाद माटे शेख,साबेर, गूणवंत विरकर,कोंडीबाराव आंबेगावकर,धारोजी कानोडे, राजू कानोड,शंकर ढगे, मनोज कदम, नवनाथ बारसे, प्रभाकर सोळंके, भागवत देशमुख आदी उपस्थित होते. गेल्या दहा वर्षांत संचलक मंडळाने सहकार्य केल्यामुळे पतसंस्था यशस्वीपणे चावता आली . यापुढे नवीन पदाधिकार्यांना सहकार्य करण्यांत येईल अशा भावना माजी अध्यक्ष संचालक आर आर देशमुख यांनी व्यक्त केल्या.
सर्वसामन्य नागरिक,व्यवसाईक यांच्या कर्जविषयी गरजा पूर्ण करण्यासाठी संस्था स्थापन करण्यात आली आहे.येणाऱ्या काळात ज्येष्ठ संचालक, पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेची वाटचाल करण्यात येईल अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे यांनी दिली.या निवडीचे शिवसेना प्रणीत शेतकरी, शेतमजूर सेनेचे राज्य सरचिटणीस प्रल्हाद इंगोले,पूरभाजी कानोडे नवनाथ ढगे, माधव चव्हाण,सोनू राऊत गोपाळ पंडित, पंडित लंगडे, नितीन नागलमे, विशाल मोरे यांनी स्वागत करुन शूभेच्छा दिल्या.