पेट-२०२२ च्या उर्वरित विषयाची परीक्षा १९ व २० जूनला -NNL


नांदेड|
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे पेट-२०२२ या पीएच.डी. पूर्व प्रवेश परीक्षा तीन टप्यामध्ये घेण्यात येत आहेत. त्यापैकी पहिल्या टप्यातील परीक्षा २७ मे रोजी संपन्न झाली आहे. दुसरा टप्पा १९ जून रोजी तर तिसरा टप्पा २० जून रोजी घेण्यात येणार आहे. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी कळविले आहे. दुसऱ्या टप्यातील दि. १९ जून रोजी दोन सत्रामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत. पहिले सत्र स. ११:०० ते दु. ०१:०० असे दोन तासाचे असणार आहे. दुसरे सत्र दु. ०३:०० ते ०५:०० असे दोन तासाचे असणार आहे.

रविवार दि. १९ जून रोजी सकाळच्या सत्रामध्ये फिलॉसाफी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, कम्प्युटर सायन्स, बायो इन्फॉर्मेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, इन्व्हायर्नमेंटल सायन्स, मायक्रोबायोलॉजी, स्टॅटिस्टिक्स, सिव्हिल इंजीनिअरिंग, कम्प्युटर सायन्सेस अँड इंजीनिअरिंग, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि कम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनिअरिंग, फिजिकल एज्युकेशन, मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम इ. विषयाच्या परीक्षा होणार आहेत. तर याच दिवशी दुपारच्या सत्रामध्ये मराठी, पॉलिटिकल सायन्स आणि कॉमर्स या विषयाच्या परीक्षा होणार आहेत.

सोमवार दि. २० जून रोजी सकाळच्या सत्रामध्ये मॅथेमॅटिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, मॅनेजमेंट सायन्स, इ. विषयाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. तर दुपारच्या सत्रामध्ये ह्युमन राइट्स, फार्मसी, सोसिओलॉजी, लायब्ररी अंड इफॉर्मेशन सायन्स, झूओलॉजी आणि फिजिक्स इ. विषयाच्या परीक्षा होणार आहेत.

पेट-२०२२ या पीएच.डी. पूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या नोंदणीकृत लॉगइन आयडी मध्ये उपलब्ध झालेले आहेत. ते विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करून घ्यावे, तसेच परीक्षा सुरु होण्याच्या ३० मी. अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी