सृष्टीला वाचविण्यासाठी वृक्षलागवड करा
उस्माननगर,माणिक भिसे। दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान कमी करण्यासाठी प्रत्येक माणसाने झाड लावणे आवश्यक आहे,.या सृष्टीला प्रदुषणापासुन वाचवायाचे आसेल तर वृक्षलागवड करा असे उस्माननगर येथील बीट विभागाचे वनरक्षक नामदेव पंढरे यांनी प्रतिपादन केले.
उस्माननगर बीट वनविभागाचे वनरक्षक नामदेव पंढरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमा प्रसंगी वनरक्षक नामदेव पंढरे पुढे म्हणाले की, जमीनीवर वावरणाऱ्या प्रत्येक घटकातील पशु,प्राणी , मानवाला सावली व स्वच्छ हवा अत्यंत आवश्यक आहे.तुम्ही पाहीले आसेल कोरोना काळात आॅकिसीजन साठी केवढी थडपड झाली.म्हणून प्रत्येक नागरिकांनी एक तरी झाड लावून,त्याची जोपासून आपला मित्र बनवा.व आपला परिसर स्वच्छ व निर्मळ करा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.के.एस.दुलेवाड , प्रा.आरोग्य सेविका जेएनएम के.वि.कल्याणकर, तसेच रोप रखवालदार चांदोबा भिसे, गावातील नागरिक उपस्थित होते.