नांदेड। जिल्ह्यातील केदारनाथ यात्रेकरूंची टीम नांदेड येथून 10 मे रोजी गिरी यात्रा कंपनी मार्फत लक्झरी बसने तीस दिवसासाठी उत्तर भारतातील यात्रेस रवाना झाले आहेत. त्या यात्रेत 136 जण आहेत 4 जून रोजी पुण्यातील एका एजंट द्वारे बारा जणांची फसवणूक झाली आहे.
शिरसी ते केदारनाथ वीस किलोमीटर हेलिकॉप्टरने केदारनाथला जाणीव येणे तिकीट काढले होते पण पाच जून रोजी प्रत्यक्ष हेलिपॅडवर गेल्यावर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रमाणे सदरील तिकीट बोगस असल्याचे कळाले.
शिरसी येथे सहा हेलिपॅड आहेत ह्या हेलिपॅडवर जाण्यास बारा यात्रेकरूंची पाचशे रुपये प्रमाणे सहा हजार रुपये खर्च केले व वेळ निघून गेल्यामुळे केदारनाथचे दर्शन होऊ शकले नाही त्यामुळे सर्व यात्रेकरूंची फसवणूक झाल्याचे झाल्याने त्या एजंट वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नांदेडच्या यात्रेकरूंनी केली आहे