हदगाव शहरात व तालुक्यात टक्केवारीने विकास कामाची लागली वाट ....!
हदगाव, शे चांदपाशा| हदगाव शहरासह तालुक्यात गावपातळीवर मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. काही कामे माञ नाव प्रसिद्ध कंञाटदाराच्या नावे विशिष्ट खास व्यक्ती कडुन केले जात असल्याने यांच्या टक्केवारीमुळे कामाचा तर दर्जा दिसुन येत नाही. परिणामी गुणवत्ता ढासळली असुन, या बाबतीत हदगाव विधानसभा क्षेञाचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी लक्ष घालावे अशी मागणी शहरासह गावक-यातुन जोर धरित आहे.
शहरात तर काही कामे एका आठवड्यात नाली व रोडच्या कामाची वाट लागली आहे. त्यात प्रामुख्याने प्रभाग १ मध्ये काही महीण्यापुर्वी रोड व नालीचे काम एका कञाटदाराच्या नावे करण्यात आली. त्या कामाची गुणवत्ता पाहीले असता लगेच लक्षात येते की, शासनाच्या निधीचा कसा दुरुपयोग करण्यात आले. गाव पातळीवर विकास कामे जोरात सुरु आहे कामाच्या दर्जा बाबतीत विचरणा केली आसता नादेड जिल्ह्यातील अमुक -तमुक नेत्याच्या जवळच्या कार्यकर्तेच हे काम करत असल्याचे सागण्यात येते.
या मुळे सर्व सामान्य नागरिक व ग्रामस्थ बड्या नेत्याशी पंगा नको म्हणून मौण धारण केल्याचे दिसुन येत आहे. कारण हे लाखो करोडो रु काम कोणत्या योजनेच्या अतर्गत होत आहे. या बाबतीत कोणत्याही प्रकारचे कोणतेही बोर्ड शहरात किवा गाव पातळीवरच्या कामावर त्या ठिकाणी लावलेली नसते. जर कोणी ग्रामस्थानी कामाच्या गुणवत्ता बाबतीत तक्रारी केल्या तरी संबंधित विभाग किवा नादेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी काडीचा ही दखल घेत नाही ही वस्तुस्थिती आहे.
आमदार अधिकारी व पञकार...विद्यमान आमदारानी स्थानिक आधिकारी व पञकारच्या समक्ष प्रशासकीय अधिका-याची बैठक अपेक्षित आहे. पण या विषयी विद्यमान आमदार याच्याकडे वेळ दिसुन येत नाही. या पुर्वी पहील्या टर्ममध्ये ते आवर्जून स्थानिक व स्थानिक पञकारांना भेटायचे विकासाच्या बाबतीत माहीती सुचना पण दयायचे. परंतु सध्या अशी परिस्थिती दिसुन येत नाही ही वस्तुस्थिती आहे.
निधी खासदाराचा व उद्घाटन आमदाराच..हिगोली लोकसभाचे खा हेंमत पाटील यांनी दोन दिवसापुर्वीच शिवसेनेच्या शहरातील एका कार्यक्रमात स्पष्ट टीका केली की, निधी मी आणतो अन् उद्घाटन विद्यमान आमदार करतात. या बाबतीत विद्यमान आमदार किवा काँग्रेसचा एक ही जबाबदार पदधिकारी खासदाराच्या या टिकेवर आतापर्यत 'ब्र 'शब्द सुध्दा काढलेल नाही हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.