नांदेड। वटपोर्णिमा निमित्त टाकळगाव येथिल स्मशानभूमि परिसरात सरपंच भिमराव लामदाडे यांच्या हस्ते वडवृक्ष लागवडीचा शुभारंभ १४ जुंन रोजी करण्यात आला.
वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो. याशिवाय वडाचे झाड एका तासाला साधारणपणे सातशेबारा किलो ह्या प्रमाणात ऑक्सिजन वातावरणात सोडते,वडवक्ष हे औषधी गुणधर्माचे वृक्ष असल्याने स्मशानभूमी परिसरात 100 वडवृक्षाचे वृक्षारोपण करून त्यांचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.
या वेळी ग्रामविकास अधिकारी अमृत शिंदे,उपसरपंच संभाजी चिंतोरे,महात्मागांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकरराव मोरे, ग्रा.पं.सदस्य रामकिशन पांचाळ,दत्ता देवकांबळे व व्यंकटराव खानसोळे,रामदास लामदाडे,विठ्ठल लामदाडे,लक्ष्मण लामदाडे,अशोक मोरे ईत्यादी उपस्थित होते.