प्रतिमा उत्कट रंग कथा २२’ प्रदर्शन ९ जूनपासून; ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाचे आयोजन -NNL


पुणे।
ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळळाच्या( JPPAF )- कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गटाने ९ ते १२ जून दरम्यान  ‘प्रतिमा उत्कट – रंग कथा २२ ‘ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 

मिलिंद संत, डॉ. पं.समीर दुबळे, श्रीमती अमिता पटवर्धन, श्रीमती चेतना गोसावी यांनी सोमवारी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गट हा विविध कला प्रकारात काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सुरू झालेला एक महत्वाचा गट आहे. या गटाने या कला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

‘प्रतिमा उत्कट – रंगकथा २२’ हे चित्रकला प्रदर्शन हे या उद्देशाने आयोजित केले आहे. दि. ९ ते १२ जून २०२२ या काळात राजा रवीवर्मा कला दालन, घोले रस्ता, पुणे येथे  हे प्रदर्शन होणार असून, ९ जून रोजी सायं. ५.३० वा. श्रीकांत प्रधान यांच्या  हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. 

 त्यानंतर पुढचे तीन दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. या प्रदर्शनात सुमारे ७० कलाकारांनी आपली चित्रे पाठवली होती आणि त्यातल्या बहुसंख्य कलाकारांची चित्रे या प्रदर्शनात सहभागी केलेली आहेत. 

प्रत्येक दिवशी प्रदर्शनाबरोबरच अनेक मान्यवर कलाकारांचे प्रात्यक्षिक सत्रे आयोजित केलेली आहेत. त्यात गणेश कळसकर,  अदिती जोगळेकर, चारूहास पंडित, विलास कुलकर्णी, .स्नेहल पागे,  संजय देसाई, आणि  श्रुती निगुडकर यांची सत्रे होणार आहेत. 

या आयोजनामध्ये ‘आर्टिस्ट कट्टा ‘ या संस्थेचे महत्वाचे योगदान आहे. आर्टिस्ट कट्टा पुण्यातील दृश्य कलेच्या क्षेत्रात सुपरिचित नाव आहे. चित्रकलेची समज वाढावी आणि नवोदित कलाकारांना पाठबळ मिळावे या हेतूने आर्टिस्ट कट्टा विविध उपक्रम योजित असते. दृश्य कलेची सर्व प्रकारची साधन सामग्री अत्यंत वाजवी दरात तिथे उपलब्ध असते.

कलांच्या माध्यमातून आनंद निर्मितीचा प्रयत्न 

पुण्यातील नामवंत शैक्षणिक  संस्था असलेल्या  ज्ञान प्रबोधिनी शिक्षण क्षेत्रातील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यामुळे सुपरिचित आहे. ज्ञान प्रबोधिनी प्रशाळेचा सुवर्ण महोत्सव २०१९ मध्ये साजरा झाला आणि त्या निमित्ताने ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाची  ( JPPAF ) स्थापना झाली. त्यानंतर विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने वेगवेगळे विशेष उद्दिष्ट गट कार्यरत झाले. कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गट हा विविध कला प्रकारात काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सुरू झालेला एक महत्वाचा गट आहे. 

सर्व प्रकारच्या कलांच्या जोपासनेसाठी कलाकारांनी, रसिकांनी , आस्वादकांनी, कलेला आर्थिक पाठबळ देऊ शकणाऱ्या दानशूर व्यक्ति,आणि संस्थांनी एकत्रित येऊन कलांच्या माध्यमातून आनंद निर्माण करावा आणि समाज स्वस्थ, सुसंस्कृत, समावेशक विचारांची कास धरणारा व्हावा यासाठी प्रयत्न करण्यासाठी हा गट विविध उपक्रम, कार्यक्रम, व्याख्याने, मेळावे आयोजित करत असतो. 

या निमित्ताने कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गटाच्या उपक्रमात ज्यांना सहभागी व्हायचे असेल अथवा त्याबद्दल माहिती करून घ्यायची असेल त्यांनी प्रदर्शन स्थळी आपले नाव नोंदवावे म्हणजे पुढील उपक्रमांबद्दल आपल्याला कळवणे शक्य होईल. 

‘प्रतिमा उत्कट रंग कथा २२’ ही केवळ सुरुवात आहे. अनेकांच्या मनात अनेक कला प्रकारा विषयी आस्था असते, करून पाहायची इच्छा असते पण नेमके काय करावे हे लक्षात येत नाही किंवा आपल्या कला गुणांना व्यासपीठ कसे मिळवावे याबद्दल कल्पना नसते. अशा सर्व समाज घटकांनी मोकळेपणानी व्यक्त होण्यासाठीच कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गट कार्यरत आहे. या वर्षी कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गट एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करत आहे - "रियाझ". विविध कलांमधील होतकरू आणि ज्येष्ठ कलाकार एकत्र येऊन रियाझ करतील अशी या उपक्रमा मागची भूमिका आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी