हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सरसम बु.येथील एका युवा शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सरसम गावावर शोककळा पसरली आहे. रुपेश उर्फ धम्मपाल सखाराम थोरात असे मयत शेतकऱ्याचं नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात गतवर्षी अतिवृष्टीने हैराण करून सोडले. असे असताना देखील अनेक शेतकऱ्यांनी रब्बीसाठी भरपुर मेहनत केली, मात्र एन पिकाच्या मोसमात वादळी वाऱ्याने होत्याचे नव्हते केले. त्यामुळे कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. असाच काहीसा अनुभव हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु येथील शेतकऱ्यास आला आहे. यामुळे बैंकेचे कर्ज कसे फेडायचे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेने युवा शेतकरी रुपेश उर्फ धम्मपाल सखाराम थोरात वय ३२ वर्ष यां अविवाहित शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली आहे.
ऐन खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर आला असताना युवा शेतकऱ्याने हे टोकाचे पूल उचलले असल्याने सर्वस्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत युवा शेतकऱ्याच्या नवे ४ एकर शेती आहे, त्यांनी भारतीय स्टेट बैन्केकडून ९० हजार कर्ज घेतले होते. तसेच कृषी विभागाकडून शेतीसाठी ट्रॅक्टर उचलले होते. मात्र अनेक वर्षपासून होत अतिवृष्टी व नापिकीमुळे शेती नुकसानित अली होती. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला होता. मागील काळात शेतीसाठी बैन्केकडून घेतलेले कर्जाची परतफेड झाली नसल्याने यंदा कृषी लोन मिळण्याची आशा धूसर झाली होती. त्यामुळे यंदा पेरणी कशी करावी या विचारात शेतकरी सतत चिंतामग्न राहत होता. याच विवंचनेतून रुपेश उर्फ धम्मपाल सखाराम थोरात यांनी आपले शेत सर्वे क्रमांक २१४/२ मधील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
या घटनेची माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी हजार होऊन पंचनामा केला. मयत युवा शेतकऱ्याच्या प्रेताचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. शेतकऱ्याच्या कुटुंबाना या दुःखातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.