डॉ.धोंडे व सहकारी डॉक्टरांचा आठ वर्षा पासून वृक्ष लागवड व संवर्धन उपक्रम -NNL


लोहा।
झाडे लावून त्यांचे केवळ प्रसिद्धी नाही ते ती झाडे जगली पाहिजे आणि जगविणाऱ्याची हमी असेल तेथेच  झाडे व त्यासाठी लोखंडी जाळी  द्यायची व तेथे जाऊन वृक्षारोपण करायचे आणि   त्याचा फालोप घ्यायचा .असे  आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ व लोह्याचे भूमिपुत्र डॉ प्रमोद वीरभद्रअप्पा धोंडे  हे उपक्रम  राबवितात.सुनेगाव व मुरुडदेव पिंपळगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले

लोह्याचे भूमिपुत्र डॉ प्रमोद धोंडे  व त्यांचे सहकारी डॉक्टर मित्र हे दरवर्षी जून महिन्यात पाऊस झाल्या नंतर तालुक्याच्या व जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात वृक्षारोपण करतात.स्वखर्चाने चांगली झाडे आणि त्याला मजबूत जाळी बसवितात.त्या झाडांची देखरेख करणाऱ्या भागांची निवड केली जाते. यंदा लोहा शहराच्या जवळील असलेल्या सुनेगाव( कुत्राचे) या गावात मारुती मंदिरा जवळ डॉ प्रमोद धोंडे, या गावचे भूमिपुत्र डॉ राजेंद्र जाधव,डॉ प्रशांत शिरुरे, पर्यवेक्षक बी डी जाधव, पिंपळगाव (वाणी )सरपंच सोनटक्के, डॉ निरास, डॉ  सौ वाबळे,मॅडम श्री राठोड, श्री तांदळे तसेच वीरभद्र अप्पा धोंडे आणि गावातील प्रमुख यांच्या उपस्थितीत  सुनेगावात ५०झाडे व त्यांना जाळी बसविण्यात आले ते  पालम गावातील वाणी पिंपळगाव येथे ही वृक्षारोपण करण्यात आले. गेल्या आठ वर्षा पासून डॉ धोंडे व त्यांचे डॉक्टर मित्रांनी  वेगवेगळ्या भागात  वृक्षारोप व संवर्धन हा उपक्रम राबवितात.त्यांनी केलेले वृक्ष आता अनेक भागात डुमदार झाली आहे या सावलीत अनेकजण सुखावत आहेत यंदाही डॉ धोंडे व टीमने वृक्षारोपण केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी