नांदेड-पुणे एक्स्प्रेस 5 जुलै पासून रोज धावणार -NNL

जालना-पुणे उद्घाटन विशेष गाडी दिनांक 4 जुलै रोजी जालना येथून सुटणार


 
नांदेड। मराठवाडा विभागाचा पुणे शहराशी संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक 12730/12729  द्वी-साप्ताहिक एक्स्प्रस ची वारंवारता वाढवून दैनंदिन करण्याचा निर्णय घेतला आहे.  महत्त्वाची बाब म्हणजे, ही  गाडी  हडपसर ऐवजी थेट पुण्याला पोहोचणार आहे तसेच पुण्याहून सुटणार आहे, ज्यामुळे रेल्वे प्रवाशांना या महत्त्वाच्या शहरात जाणे सोयीचे होईल. 

दिनांक 5 जुलै, 2022 पासून नांदेड-पुणे- नांदेड ही दैनंदिन रेल्वे सेवा सुरु   होणार आहे. दिनांक 5 जुलै पासून हि रेल्वे सेवा नवीन क्रमांकाने सुरु होईल. या गाडीचा 12730/12729 हा क्रमांक बदलून 17630/17629 असा करण्यात आला आहे. या गाडीचे  उद्घाटन  दिनांक 4 जुलै 2022 रोजी  जालना येथून करण्यात येईल. गाडी संख्या 07630 जालना-पुणे विशेष गाडी जालना रेल्वे स्थानकावरून दिनांक 4 जुलै रोजी सायंकाळी 16:00 वाजता सुटेल आणि औरंगाबाद, मनमाड, कोपरगाव मार्गे पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 03.30 वाजता पोहोचेल. या गाडीत वातानुकुलीत, स्लीपर क्लास आणि जनरल क्लास चे डब्बे जोडले गेले आहेत. या गाडीचे तिकीट आरक्षण सुरु झाले आहे.   

पूर्वीचे नांदेड हडपसर एक्स्प्रेसचे गंतव्य स्थानक बदलून ते पुणे करण्यात आले आहे, यामुळे मराठवाड्यातून पुण्याला प्रवास करणाऱ्या मराठवाड्यातील लोकांसाठी हे सोयीस्कर झाले आहे.  मराठवाड्यातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रात्री सोयीच्या वेळेनुसार हि रेल्वे गाडी चालवली जात आहे, जेणेकरून ते सकाळी लवकर पुणे स्टेशनवर पोहोचतील.  गाडी क्रमांक 17630 नांदेड - पुणे एक्स्प्रेस नांदेड स्थानकातून दररोज दुपारी 15.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 05.30 वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.  परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक  17629 पुणे - नांदेड एक्स्प्रेस पुणे स्थानकातून रात्री 21.35 वाजता सुटेल आणि नांदेड स्थानकावर सकाळी 10.20 वाजता पोहोचेल. हि ट्रेन मराठवाड्याला महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या पुणे ला थेट जोडते / कनेक्टिव्हिटी प्रदान करते.  

आरामदायक प्रवासात वाढ करण्यासाठी आणि आधुनिक सुविधा देण्यासाठी, ट्रेनमध्ये नवीन अत्याधुनिक LHB कोच (डब्बे) जोडण्यात आले आहेत, जे प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा नवीन अनुभव देईल.  प्रवाशांना निर्धोक आणि सुरक्षित प्रवास करता यावा या उद्देशाने डब्यांच्या आत आणि प्रवेश दारावर  सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत जे अनधिकृत व्यक्तींच्या प्रवेशावर लक्ष ठेवण्यास मदत करतील. 

1.     गाडी संख्या 17630 नांदेड-पुणे एक्स्प्रेस : हि गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून रोज दुपारी 15.15 वाजता सुटेल आणि परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे पुणे रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी 05.20 वाजता पोहोचेल.  
2.     गाडी संख्या 17629 पुणे ते नांदेड एक्स्प्रेस : ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून रोजी रात्री 21.35 वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी मार्गे हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी 10.05 वाजता पोहोचेल.
3.     या गाडीत 15 डब्बे असतील ज्यात वातानुकुलीत प्रथम श्रेणी, वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, वातानुकुलीत तृतीय श्रेणी, द्वितीय शय्या (स्लीपर क्लास ) आणि जनरल चे डब्बे असतील.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी