शिवणी, प्रकाश कार्लेवाड। किनवट तालुक्यातील शिवणी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शिवणगाव येथे मागील दोन ते अडीच वर्षांपासून अवैधरित्या चालणाऱ्या सिमेंट खांब कारखाना जोमात चालू आहे. येथे निर्मिती होणाऱ्या सिमेंट खांब (पोल) वन विभाग तर्फे वनस्वरक्षणासाठी वापर करतात या कारखान्यात होणारे सिमेंट खांब निव्वळ निकृष्ट दर्जाचे तयार केले जातात याची वनविभागा मार्फत अनुभवी अभियंता कडून गुणवत्ता तपासून खांब जंगलाला लावायचे असते.
पण शासकीय नियम व त्याची गुणवता धाब्यावर ठेवून बोगस निकृष्ट व हलक्या दर्जाचे सिमेंट वापरून खांब तयार केले जातात. तर काही खांब जंगलात जाण्या आगोदरच चिरलेले तुटलेले टिचलेले असतात याची चौकशी न करता सर्व नियमांना डावळून संबधित गुत्तेदार हे मजूरांकडून त्या सिमेंट खांब जंगल शेजारी रोवून तार कुंपण करतात.पर्यायी एक ते दोन महिन्यातच हे पोल जमिनीवर तुटून पडतात व तुटून जातात अशा प्रकारच्या कारखानदार बद्दल वनविभागातिल अधिकारी काहीच बोलत नाहीत.तर याचे कारण कारखानदार हा किनवट तालुक्यातील एक वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा नातेवाईक असल्याचे बोलले जात असून या माध्यमातून हितसंबध जपले जातात.
एकंदरीत या निकृष्ट तयार करणाऱ्या सीमेंट खांब कारखानदार सोबत मिली भगत असल्याचे बोलले जात आहे.या कारखाना संबधी मागील चार महिण्याखाली ग्रामपंचयात येथे कायदेशीर दस्तावेज मागण्यासाठी शिवणी येथील तक्रार दराने लेखी निवेदन येथील ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आले होते.परंतु चार महिन्याचा कालावधी उलटून ही माहिती मागल्यास ग्रामविकास अधिकारी यांच्या कडून जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत उडवा उडावी चे उत्तरे देत आहेत संबधित कारखानदार ग्रामविकास अधिकाऱ्यांचे ही हात काळे केले की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. या व्यवसायात शासनाचे करोडो रुपये बळकावून शासनाचा कर व महसूल बुडवत हा गोरख धंद्या शिवणी पासून तीन किलोमीटर अंतरावर अदृश्य जागेवर जोमात चालू आहे.तर सिमेंट खांब व्यवसाय संबधी विविध शासकीय जिल्हा कार्यालयाकडून व तालुका दंडाधिकारी यांच्या कडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी वन्य प्रेमी कडून बोलले जात आहे.संबधित कारखाना हा वैध की,अवैध याची चाचपणी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी शिवणी परिसरातल्या नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणी दि.९ सप्टेंबर २०२१ रोजी कारखानदार यांच्या कडून निकृष्ट सिमेंट खांब तयार केल्याने वन्य जीव व जंगल स्वरक्षणा साठी रोवलेल्या खांब अवघ्या काही दिवसातच जमिनीवर आडवे पडून तार कुंपण विस्कळीत होत असल्याने शासनाचे करोडो रुपये वाया गेल्याने सदर सिमेंट खांब तयार करणाऱ्या कारखानदारा विरूद्ध शिवणी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने या प्रकरणी चौकशी करण्यात यावी म्हणून अशा प्रकारच्या तक्रारची लेखी निवेदन.दि ९ सप्टेंबर २०२१ रोजी मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद व उपवनसंरक्षक नांदेड यांना दिले होते. त्या संबंधी दि.४ ऑक्टोबर २०२१ रोजी सहाय्यक वनसंरक्षक रोहयो व वन्यजीव या कार्यालयातून तक्रारदारास पूर्ण पुरावेनीशी १२ ऑक्टोबर २०२१ रोजी संबधित कार्यालयात हजर राहण्याचे पत्र पाठवण्यात आले होते.
पण ते पत्र तक्रारदारास १६ ऑक्टोबर २०२१ रोजी मिळाल्याने चौकशी झाली नाही.तद नंतर दि.२५ ऑक्टोबर ला दुसरे पत्र द्वारे २८ ऑक्टोबर रोजी हजार राहण्याचे कळविले होते.पण दुसऱ्यांदा ही पत्र वेळेवर न येता ०७ नोव्हेंबर २०२१ रोजी संबधित तक्रारदाराला हे पत्र मिळाले होते.करिता तेंव्हा पासून हे चोकशी चे प्रकरण आजपर्यंत गुलदस्त्यात आहे.तर तक्रारदार यांनी मुख्य वनसंरक्षक साहेब कार्यालय औरंगाबाद येथे दाद मागणार आहे असे कळविले.