गुरुद्वारा बोर्डावर पत्रकार, वकील, शिक्षक, महिला आणि समाजसेवकांना नियुक्ती मिळावी -NNL

पत्रकार रविंद्रसिंघ मोदी यांची मागणी 


नांदेड।
येथील सुप्रसिद्ध धार्मिक संस्था गुरुद्वारा तखत सचखंड बोर्डात नवीन प्रशासकीय समितीच्या माध्यमातून पत्रकार, वकील, शिक्षक, समाजसेवक व निरनिरळ्या क्षेत्रात कार्यरत व अनुभवी लोकांना सदस्य म्हणून प्रतिनिधित्व देण्यात यावे. अशी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता स. रविंद्रसिंघ मोदी यांनी राज्याचे सार्वजनिक निर्माण मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री मा. ना. श्री अशोकरावजी चव्हाण यांना निवेदना मार्फत केली आहे. 

वरील विषयी सविस्तार वृत्त असे कि नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागमार्फत गुरुद्वारा सचखंड बोर्डला बोर्ड बर्खास्त का करण्यात यावे अशी कारणें दाखवा नोटिस पाठविण्यात आली आहे. त्यावरून असे संकेत मिळत आहे की गुरुद्वारा बोर्डावर लवकरच नवीन प्रशासकीय समिती पाचारित करण्यात येऊ शकते. नवीन प्रशासकीय समिती मध्ये नेहमीच शंभर टक्के सदस्य राजकरण क्षेत्रातून नियुक्त केले जातात. 

प्रत्यक्षात गुरुद्वारा बोर्डात नवीन संकल्पना रुजविणारे, दूरदृष्टि असणारे आणि सुशिक्षित सदस्यांची नियुक्ती जास्त प्रभावी ठरेल. त्यासाठी पत्रकार, वकील, समाजसेवक, शिक्षक, महिला व इतर क्षेत्रात कार्यरत अनुभवी लोकांना गुरुद्वारा बोर्डात सदस्य म्हणून नियुक्ती देण्यात यावी. आपल्या वतीने देण्यात येणाऱ्या समितिमध्ये पाच सदस्यांची वाढ करून त्यात अशा निरनिरळ्या घटकांचे प्रतिनिधित्व देण्यात यावे असे निवेदन पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

गुरुद्वारा सचखंड बोर्ड या संस्थेच्या कारभारात पारदर्शिता ठेवण्यासाठी आणि विकासाच्या नवीन योजनांची आखणी करणाऱ्या व्यक्तिमत्वांना संधी देण्याची गरज आहे. असे पत्रकार स. रविंद्रसिंघ मोदी यांचे म्हणणे आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी