हदगाव नगरपरिषदेच्या प्रारुप मतदार याद्या मध्ये घोळ..विद्यमान खासदार, माजी खासदार व माजी आमदारांचा आरोप -NNL


हदगाव, शे चांदपाशा।
नगरपरिषदेच्या पुढील होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक मध्ये प्रभागनिहाय मतदार याद्या मध्ये  मतदार यादीत प्रचंड प्रमाणात बोगस नावे घुसविण्यात आल्याचा आरोप हिगोली लोकसभाचे खा. हेंमत पाटील, माजी खा सुभाष वानखेडे व हदगांव विधानसभा क्षेञाचे माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी न.पा. मुख्याधिकारी यांच्या कडे एका निवेदनद्वरे केल्याने खळबळ माजली आहे.

 त्यांनी केलेल्या निवेदनात बोगस मतदाराच्या नावे काहींनी आपल्या सोयीच्या वार्डात टाकण्यात आलेल्या आहेत. माजी आमदार याच्या मते हदगाव नगरपरिषदेची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असुन न.पा.च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने  शहरातील सर्वच प्रभाग मध्ये जवळपास 200 ते 300नावे बोगस असल्याचा आरोप त्यांनी निवेदनद्वरे केलेला आहे. प्रभागरचनेनुसार सिमांकना प्रमाणे त्यांच्या प्रभागात कायम रहवाशी किंवा कोणत्याही वास्तव्य नसतांना प्रभाग बदलून तसेच अनेक ग्रामीण भागातील नावे मुद्दाम कुणाच्या तरी फायद्याचे दृष्टीने टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी दि. 27जून 2022 रोजी दिलेल्या  निवेदनात केलेला आहे.

त्याच प्रमाणे हिगोली लोकसभाचे माजी खा. सुभाष वानखेडे यांनी पण शेवटच्या दिवशी आक्षेप घेत निवेदन द्वरे त्यांनी पण गंभीर आरोप केले असुन, शहरातील प्रभाग क्र.8 मध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त बोगस नावे घुसविण्यात आलेली असुन या बाबतीत निवडणूक विभागाने सखोल निपक्ष चौकशी करुन दोषी अधिका-यावर व अश्या बोगस मतदारावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी निवेदन द्वरे केली आहे.

21जून 2022 ला निवडणूक विभागातर्फ प्रभाग निहाय मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या आक्षेप घेण्याची शेवटची ता. 27जून 2022 होती या बाबतीत काही नागरिकांनी ही आक्षेप घेतलेले असुन, प्रथदर्शी यादी मध्ये अनेक प्रकारच्या ञुर्टीया घोळ आहे. अनेक वर्षापासून ज्या प्रभागात वास्तव्य आहे व अनेक वर्षापासून मतदान करित असुन सुद्धा प्रकाशित करण्यात आलेल्या यादीत त्यांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात येत असल्याचे माहीती अनेक नागरिकांनी सांगितले मतदार यादीतील ञूटी दुर करुन करावी कारण स्वतःच्या प्रभागातील उमेदवाराला मतदान करता येईल.तसेच मतदार यादीवर आक्षेप घेण्यात येणाऱ्या तारखेत वाढ करण्यात यावीअशी मागणी ही काही नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी