किनवटच्या सरस्वती विद्या मंदिर विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी|
उच्च माध्यमिक परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, या परीक्षेत किनवट येथील सरस्वती विद्या मंदिर विद्यालयाने  उज्वल यशाची परंपरा कायम राखली असून , या विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 96%,कला शाखा91%  तर व्यवसायिक अभ्यासक्रमाचा 81 टक्के निकाल लागला आहे यात मुलींनी बाजी मारली असून राठोड कादंबरी राजू .87. 83%  गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला तर कला शाखेतून सोळंके राणी विलास या विद्यार्थिनीने 82.67% गुण घेऊन प्रथम आली आहे  या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार यांच्यासह प्राध्यापक,शिक्षक व पालक वर्गाकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.

किनवट येथील सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे ,या विद्यालयाने यावर्षीही आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली असुन नुकत्याच घोषित झालेल्या उच्च माध्यमिक परीक्षेच्या निकालात येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा कला शाखा 91% असून विज्ञान शाखा 96% तर व्यवसायिक अभ्यासक्रमाची टक्केवारी81% इतकी आहे. 

कला शाखेतून एकूण विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह पास झाले आहे तर 85 विद्यार्थी प्रथम श्रेणीत  90 विद्यार्थी द्वितीय श्रेणी श्रेणीचे गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी सोळंके राणी विलास या विद्यार्थिनीने 82 .67%  घेऊन प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. विज्ञान शाखेतून एकूण विद्यार्थ्यांपैकी 53 विद्यार्थी विशेष प्राविण्य घेऊन यशस्वी झाले आहेत 66 विद्यार्थी प्रथम तर 30 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीचे गुण मिळवले आहेत. विज्ञान शाखेतून राठोड कादंबरी राजू हिने 87. 83 टक्के गुण घेऊन  प्रथम आली तर  राठोड पूजा मनोज हिने 84.33 % गुण घेऊन दुसरा क्रमांक तर इटकेपेलीवार अनुष्का सुनिल 84.33% गुण घेवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमातही येथील  विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन केले आहे. विद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकाच्या परिश्रमातुन  विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार सचिव तथा मुख्याध्यापक कृष्णकुमार नेमानी वार उपमुख्याध्यापक संजय चव्हाण पर्यवेक्षक पहुरकर यांच्यासह पालक वर्गाकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

1 Comments

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी