चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रेल्वेतील हमालांना छत्र्या वाटप -NNL


नांदेड|
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या तर्फे नांदेडभूषण ॲड. मिलिंद एकताटे व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते रेल्वेतील हमालांना छत्र्या वाटप करण्यात आल्या.

रेल्वे स्टेशन येथे झालेल्या कार्यक्रमाला रेल्वेचे मुख्य वाणिज्य निरीक्षक संजीवकुमार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, जिल्हा सचिव मनोज जाधव, भाजपा रेल्वे पार्सल कामगार आघाडीचे अध्यक्ष गोपाळराव माळगे, सचिव मारोतराव कुमार, ॲड. पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक करताना दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की, कृपाछत्र या उपक्रमाखाली गरजूंना छत्र्या वाटपाचे हे तिसरे वर्ष असून यावर्षी लोकसहभागातून २०२२ छत्र्या वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

प्रवीण साले यांनी मार्गदर्शन करतांना असे सांगितले की, कामगारांच्या घरात जन्म घेऊन आपल्या पक्षनिष्ठेमुळे जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान असणाऱ्या चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस कामगारासमवेत साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम दिलीप ठाकूर यांनी आयोजित केला हे कौतुकास्पद आहे.ॲड. एकताटे यांनी आपल्या भाषणातून वेगवेगळ्या प्रसंगाचे औचित्य साधून दिलीप ठाकूर हे नवीन नवीन सेवा करण्याचे मार्ग अवलंबित असल्यामुळे त्यांचे अनुकरण राजकीय व सामाजिक क्षेत्रातील इतर कार्यकर्त्यांनी केल्यास आदर्श समाज निर्मिती होईल असा आशावाद व्यक्त केला.

शेख अक्रम, योगेश कांबळे, नसीर शेख, चंद्रकांत सुगावकर, नसीर अहेमद, अभिषेक माळगे, सय्यद इम्रान, विकास नामेवार यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आकाश नामेवार यांनी तर आभार  तेजस माळगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष हटकर, राहुल कांबळे, शेख फिरोज, समिउल्ला खान, बाबूखान, त्रिशिलाबाई यांनी परिश्रम घेतले. कामगार पुत्राचा वाढदिवस कामगारा समवेत साजरा करून नवीन पायंडा पाडल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी