राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान खलील खान पठाण
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातुन जाणारा राज्य रस्ता क्रं. 161 अ मधिल असलेले उड्डानपुल (LVUP) हे पूर्वीच्या अंदाजपत्रकानुसार करनयेत यावे आणि भविष्यात शहरात होणाऱ्या अवजड वाहनांची अडचण आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान खलील खान पठाण यांनी राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांचेकडे निवेदन देऊन केली आहे
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातुन जाणारा राज्य रस्ता क्रं.१६१अ हा भोकर ते हिमायतनगर ते किनवट (नॅशनल हायवे कश्मिर ते कन्याकुमारी जाणाऱ्या रोडला मिसळणारा रस्ता) असा जात आहे. सदरील राज्य रस्त्यावर हिमायतनगर शहरामधुन जात असल्यामुळे पहिल्या अंदाज पत्रकामध्ये उड्डानपुलाचा स्पष्ट उल्लेख करण्यांत आलेला आहे. परंतु कांही राजकीय मंडळी स्वत:च्या फायद्या करीता सदरील शहरामधुन जात असलेला उड्डानपुल हा रद्द करण्यांचा घाट घातलेला आहे. या राज्य रस्त्यावर शहरालगत रेल्वे स्टेशन हाकेच्याच अंतरावर आहे. त्याकरीता या ठिकाणी उड्डानपुल होणे अतिआवश्यक आहे.
सदरील रस्ता हा अत्यंत धिम्या गत्तीने करण्यात येत असल्यामुळे या रस्त्यावर दररोज रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या प्रवाशांचे व मोटार सायकलीचे ऑक्सीजंट होत आहेत. कित्येक प्रवाशांना आपला जिव सुध्दा गमवावा लागत आहे. त्याकरीता हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या या राज्य रस्त्यावरील उड्डानपुल पहिल्या अंदाजपत्रकानुसारच करण्यांत यावे. आणि यासंबंधीची ताकीद सादर गुत्तेदारास देऊन शहरातील नागरिकांना होणारी अडचण आणि जीविताचा संभाव्य धोका टाळावा अशी मागणी मुख्य अभियंता याना देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.