परिवाहान महामंडळाच्या गाड्या उस्माननगर गावापर्यंत सोडण्याची प्रवाशांची मागणी -NNL


उस्माननगर, माणिक भिसे|
नांदेड ते  कंधार ,मार्गे बिदर राष्ट्रीय महामार्गावर परिवाहान महामंडळाच्या लालपरी धावणाऱ्या गाड्या जर उस्माननगर गावातून फिरून जाव्यात अशी प्रवाशांच्या वतीने शेरुमियाॅ  फकिरसाब आदमनकर , श्रीनिवास दिंगबर देशपांडे यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे मासीक बैठकीत अर्ज देऊन ठराव संबंधित विभागाकडे मागणी करण्याची मागणी केली आहे. 

मागील दोन वर्षांपासून संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोणाने हाहाकार माजला होता.यामुळे अनेकांचा मृत्यू झाला.आपले नात्यातले व सखे नातलग दुर केले होते.सरकारने सर्वत्र बंदी केल्यामुळे नियोजन बिघडले होते.आता कोरोना हा रोग गेला असल्याने सरकारने हाळूहाळू बंदी उठवल्यानंतर महामंडळाच्या लालपरी गाड्या धावत आहेत.उस्माननगर परिसरातून प्रवाशांना जिल्ह्याच्या ठिकाणी कामानिमित्त व  लग्न ,भेटीगाठी जाणार्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.प्रवशाना नांदेड ते उस्माननगर एक गाडी असल्याने नागरिकांना वेळेवर भेटत नाही.

राष्ट्रीय महामार्गावर परिवाहान महामंडळाच्या गाड्या चालू असल्यामुळे उस्माननगर चौकातून जात आहेत.त्याच गाड्या जर उस्माननगर येथे ( टच ) फिरुन गेल्यातर प्रवशाची आडचण दूर करण्यासाठी मदत होईल. नांदेड ते कंधार मार्गे बिदर ला जाणार्या गाड्या मधून येताना प्रवाशांना चौकात उतरून गावात पायी पायी चालत यावे लागत आहे.तर संबंधित विभागाने परिवाहान महामंडळाने गाड्या उस्माननगर गावापर्यंत सोडण्यात  याव्यात अशी मागणी प्रवाशांच्या वतीने शेरुमियाॅ फकिरसाब आदमनकर श्रीनिवास दिंगबर देशपांडे यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे मासीक बैठकीत अर्ज देऊन ठराव मंजूर करण्यात आला आहे.तात्काळ गाड्या चालू करून प्रवशाची होणारी हेळसांड थांबवावी .अशी मागणी होतं आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी