महाविद्यालयांच्या जागेत मास्टर प्लाॅन तयार करणार
अर्धापूर, निळकंठ मदने| श्रीमतांचे मुले मोठ्या शहरात शिक्षण घेतात,त्यां मुलांशी ग्रामीण भागातील गरीबांच्या मुलांची परीक्षेत,गुणात्मक स्पर्धा असते,त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणीक वातावरणासह उच्चप्रतीचे शिक्षण देऊन केवळ देखावा न करता गुणवता निर्माण करणे हेच आमचे ध्येय असून, अर्धापूर तालुक्याचे नाव शौक्षणीक क्षेत्रात उंचवावे याकामी शिक्षक,पालक,संस्थेने पुर्ण लक्ष द्यावे असे प्रतिपादन आढावा बैठकित शारदा भवन संस्थेच्या उपाध्यक्षा तथा माजी आमदार सौ अमिता अशोकराव चव्हाण यांनी केले .
भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर तालुक्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठावे यासाठी अर्धापूर शहरात डॉ शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रशस्त इमारतीमध्ये शारदा भवनची नवीन शाळा महात्मा फुले शाळेच्या धर्तीवर विनाशुल्क यावर्षी सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या नोंदी व प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला असून,या शाळेचे संचालक मंडळावर पालकांनी विश्र्वास ठेवून हजारो पालकांनी प्रवेशासाठी गर्दी केली. आढावा बैठकीला शारदा भवन संस्थेच्या उपाध्यक्षा तथा माजी आमदार सौ.अमिता अशोकराव चव्हाण,सचीव तथा माजी मंत्री डि पी सावंत, प्राचार्य के के पाटील,शिक्षकवृंद,पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी अमिता चव्हाण म्हणाल्या कि, डॉ.शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या जागेचा आधुनिकीकरणासाठी मास्टर प्लाॅन तयार करण्यात येणार असून,येथे शारदा भवनची नवीन शाळा सुरू करण्यात येणार आहे आहे ,शारदा भवनच्या विद्यार्थींना महाविद्यालयाच्या प्रांगणात खेळणार मंजुरी यावेळी देण्यात आली असून,शाळेची गुणवता चांगली ठेवण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थी घडविण्याकामी पुर्ण वेळ देऊन,शाळेच्या वेळेत मोबाईल वापरावर बंदी घालण्यात येणार असून, ग्रामीण भागातील मुलांनी शैक्षणिक क्षेत्रात उतुंग भरारी घेऊन अर्धापूर तालुक्याचे नाव शैक्षणिक क्षेत्रात करावे अशा त्या म्हणाल्या.
यावेळी डि पी सावंत म्हणाले कि, डॉ शंकरराव चव्हाण महाविद्यालयाला नॅक चा अ मानांकनचा दर्जा मिळाल्याने संस्था चालक, प्राध्यापक, पालकांचे मनोबल वृध्दीवंत झाले असून,येथील शारदा भवनची पहिली ते दहावी ची शाळा महात्मा फुले सारखी शिक्षक व पालकांच्या सहकार्याने करुत असे डि पी सावंत म्हणाले, यावेळी शिक्षकांच्या सर्व सुचनांची काळजीपूर्वक नोंद घेण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे,मुसव्वीर खतीब, सदस्य प्रवीण देशमुख, जिल्हा सचिव निळकंठराव मदने, डॉ विशाल लंगडे, व्यंकटी राऊत,उमेश सरोदे, यांच्यासह संपुर्ण शिक्षक, प्राध्यापकांची उपस्थिती होती.