लोहा| कोरोना काळात सलग दोन वर्षे शाळा नवीन शैक्षणिक वर्षात सुरू झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र पहिल्याच दिवशी शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या. पाहिल्या वर्गातील प्रवेश पात्र विद्यार्थ्याचे पुष्पगुच्छ, गणवेष देऊन स्वागत करण्यात आले तर काही ठिकाणी वाजत गाजत प्रभातफेरी काढण्यात आली. तर काही ठिकाणी सजवलेल्या झुली घातलेल्या बैल गाडीतून या पहिली वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात आले.
लोहा तालुक्यातील सर्वच शाळेत पहिल्याच दिवशी उत्साही वातावरणात अध्ययन अध्यापन सुरू झाले बिईओ सोनटक्के यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले होते त्यानुसारच सगळीकडेच वेगवेगळे उपक्रम पहिली वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आले
शिवछत्रपती प्राथमिक शाळेत पहिली वर्गातील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे माध्यमिक मुख्याध्यापक डी ई वडजे व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच जी पवार यांच्या हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्या नंतर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी सर्व शिक्षक वृद्ध, कर्मचारी उपस्थित होते.
डॉ याकूबखान उर्दू प्राथमिक शाळेत वाजत गाजत शहरात प्रभात फेरी काढण्यात आली मस्जिदीचे सदर निहाल अहमद, यांनी या प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक सुलतान खान, सरस्वती शिक्षक पतसंस्थेचे व्हा चेअरमन हरिभाऊ चव्हाण, शेख अखिल, फेरोज खान , पत्रकार शिवाजी पांचाळ, साहिन शेख, शिक्षकांचया उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.