एकनाथ शिंदेगटाने केलेल्या बंडखोरीविरोधात किनवट येथील शिवसैनिकही आक्रमक -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी|
एकनाथ शिंदेगटाने केलेल्या बंडखोरीविरोधात किनवट येथील शिवसैनिकही आक्रमक झाले असून आज शेकडो शिवसैनिकांनी जिजामाता चौकात एकनाथ शिंदे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून आंदोलन केले .यावेळी नीम का पत्ता कडवा है  एकनाथ शिंदे भडवा है, एकनाथाच कराचे काय ? वर पाय खाली मुंडक, उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है ! अशी जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेच्या त्या ४० बंडखोर गद्दार आमदाराचा किनवट शिवसेनेच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला. 

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारासह पक्षाशी बंडखोरी केल्यानंतर संबंध राज्यातील परिस्थिती अस्थिर बनली आहे. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील शिवसैनिकातून संतापाची लाट उसळली असून त्याचे पडसाद आज किनवट तालुक्यातही दिसून आले .

किनवट येथील शेकडो शिवसैनिकांनी आज तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली जिजामाता चौकात सकाळी ११ वाजता  एकनाथ शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले  व संतप्त शिवसैनिकांनी यावेळी शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली नीम का पत्ता कडवा है एकनाथ शिंदे भडवा है... अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले होते. हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना महाराष्ट्रातिल तमाम शिवसैनिक कदापी माफ करणार नाही, भविष्यात अशा गद्दारांना शिवसेना त्यांची जागा दाखविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही काही आमदारांनी पक्षाशी गद्दारी केली असली तरी सामान्य शिवसैनिक मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

अशा भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केल्या.  या आंदोलनात शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राम पाटील माजी नगरअध्यक्ष सुनिल पाटील ,शहरप्रमुख सुरज सातुरवार ,संतोष यलचलवार ,  शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती सुनकलवार, प्रमोद केंद्रे , गजानन. पाटिल कोल्हे, महिला पदाधिकारी लतिका दुसावार, तालुक्यातील सर्कलप्रमूख बजरंग वाडगुरे , रघुनाथ चरेकर , नागेश चेंद्रे , अतुल दर्शनवाड , दिलीप भोसले , संजय सकवान , घनश्याम क-हाळे , शिवम देवकते , कपिल रेड्डी , सुरेश घुमडवाड , अजय कोवे , सुनिल गरड , विजय जैस्वाल , सुनिल राठोड ,पंडित रासमवार , राकेश गणोजीवारसह शेकडो  शिवसैनिक हजर  होते. आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी