दीड लाख रुपयांची लाच स्वीकारणाºया निलंगा तहसीलदारला रंगेहात पकडले -NNL

लातुरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई


लातूर। 
अवैध वाळूचे ट्रक नियमितपणे चालू देण्यासाठी व वाळूच्या ट्रकवर यापुढे कारवाई न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारणारा निलंगा येथील तहसीलदार गणेश जाधव आणि त्याच्या एका खासगी व्यक्तीला लातुरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दि.४ जून रोजी रंगेहात पकडले़.

निलंगा पोलीस ठाण्यात तहसीलदार गणेश जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नुकतेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली़ निलंगा येथील तहसीलदार गणेश जाधव यांच्या हद्दीतून वाळू वाहतूकीच्या गाड्या चालू देण्यासाठी एका तक्रारदाराकडून प्रति ट्रक ३० हजार रुपये मागणी होत असल्याने वाळू  व्यापारी त्रस्त झाले होते. अशाच एका वाळू व्यापाºयास त्यांनी तीन ट्रकचे १ लाख ८० हजार रुपये मागितले. तर तडजोडअंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले. परंतु लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने लातूर येथील एसीबी कार्यालयात दि. २५ मे रोजी तक्रार दिली. 

या तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने २६, २८, ३० आणि ३१ मे रोजी पडताळणी सापळा लावला. त्यात दीड लाख रुपये स्वीकारण्याचे निष्पन्न झाले आणि अखेर आज शनिवार दिनांक चार जून रोजी तहसीलदाराच्या निलंगा येथील शासकीय निवासस्थानासमोर यांचा खाजगी इसम रमेश गुंडेराव मोरगे राहणार शेंदा तालुका निलंगा याने दीड लाख रुपये तहसीलदार गणेश जाधव यांच्या सांगण्यावरून स्वीकारले. यावेळी पथकप्रमुख अन्वर मुजावर यांनी रमेश मोरगे आणि तहसीलदार गणेश जाधव यांना रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण, लातूरचे पोलीस उपाधिक्षक पंडित रेजीतवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली आणि अन्वर मुजावर यांच्या पथकाने केली.

महसुल विभागात खळबळ
अवैध वाळू उपसा व उत्खनन हा नेहमीच खळीचा मुद्दा राहिलेला आहे़ या मुद्दावरुन महसुल विभाग व इतर विभागांमध्ये नेहमी आरोपप्रत्यारोप होत आलेले आहेत़ वाळू माफियांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसले आहे़ वाळू माफियांच्या सुरस कथाही नेहमीच या ना त्या कारणांनी समोर येत आहेत़ या वाळू माफियांची हात मिळवणी करुन वाळू वाहतुक करणाºया ट्रकवर यापुढे कारवाई न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात चक्क तहसीलदारच रंगेहात सापडल्याने महसुल विभागात एकच खळबळ उडाली आहे़

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी