नविन नांदेड। चार गाव पाणीपुरवठा अंतर्गत करण्यात येणा-या पिण्याच्या पाईप लाईन गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता रुंदीकरण नावाखाली रस्ता खोदल्या मुळे तुटल्याने गावातील पाणी पुरवठा बंद झाला होता व ग्रामस्थांना तिव्र टंचाई निर्माण झाली होती. अखेर या प्रकरणी संबंधित के.टी.एल. कन्स्ट्रक्शन कंपनीला तात्काळ पाईप लाईन दुरुस्ती करून पाणी पुरवठा चालु न केल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देताच रस्ता रुंदीकरण नावाखाली तोडलेली पाईप लाईन जोडली, अखेर पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिनिधी आंनदराव गुंडले, युवा नेते राहुल मोहनराव हंबर्डे,जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, मनोहर पाटील शिंदे व चार गावाचा संरपच व ग्रामपंचायत सदस्य यांनी ७ जुंन रोजी दिला होता, अखेर संबंधित कंपनी ने तात्काळ पाणीपुरवठा लाईन जोडल्या नंतर दुसऱ्या दिवशी ८ रोजी पाणी पुरवठा सुरळीत चालू झाला.
नागपूर ते तुळजापूर या महामार्गाचे रस्ता रुंदीकरण काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर लातुर फाटा सिडको येथे चालु असतांनाच या ठिकाणी जाणाऱ्या या ठिकाणी विष्णुपुरी प्रकल्प येथुन जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत चार गाव पाणीपुरवठा अंतर्गत वाजेगाव, धनेगाव,बळीरामपुर,तुप्पा येथे पिण्याच्या पाण्याची मोठी लाईन टाकण्यात आली होती आहे, या ठिकाणी रस्ता रुंदीकरण नावाखाली रस्ता खोदल्या मुळे पाणी पुरवठा करण्यात येणारी लाईन के.टी.एल.कंपनी कडुन तुटल्या गेल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली व चार गावांना होणारा पाणीपुरवठा दहा दिवसांपासून बंद होता ,या प्रकरणी संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्य व संरपच यांनी जिल्हायांचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्याशी संपर्क साधून व माहिती दिल्यानंतर व वरीषठ अधिकारी यांना कळवुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातुर फाटा सिडको येथे येऊन फुटलेली पाईप लाईन पाहणी केली व खड्या मध्ये हजारो लिटर पाणी जमा झाले होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्यांसह धनेगाव ग्रामपंचायत संरपच गंगाधर ऊर्फ पिंटू पाटील शिंदे, बळीरामपुर ग्रामपंचायत संरपच अमोल गोडबोले, तुप्पा ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी ज्ञानेशवर यन्नावार, चिमणाजी पाटील कदम, दता पाटील कदम ,मंहमद रफीभाई यांच्या सह ग्रामस्थ यांनी करून तात्काळ जोडणी करून पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. अखेर संबंधित कंपनीने तोडलेली पाईप लाईन जोडल्या नंतर पाणीपुरवठा दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ जुंन रोजी पाणीपुरवठा सुरळीत झाला.