शेगाव - येथील सुप्रसिद्ध लेखिका माया दामोदर यांना जीवन गौरव पुरस्कार -NNL


नांदेड।
शेगाव येथील सुप्रसिद्ध लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या माया दामोदर यांना अखिल भारतीय वर्हाडी साहित्य मंच अकोला च्या वतीने 2022चा जिवन गौरव पुरस्कार नुकताच मथुरा लाॅन शेगाव येथील आयोजित वर्हाडी साहित्य संमेलनात प्रा. डाॅ. सतीश तराळ, विश्वस्त ,अखिल भारतीय साहित्य महामंडळ मुंबई,व शेगाव च्या प्रथम नागरिक,सौ.शकुंतलाबाई बुच यांच्या हस्ते  तसेच श्री. ज्ञानेश्वर दादा पाटील,अध्यक्ष ,माऊली  ग्रुप आफ ईन्स्टीट्यूशन्स शेगाव, पुष्कराज गावंडे महाराष्ट्र, सदस्य,महाराष्ट्र राज्य सा. सं.मंडळ,प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी बुलढाणा,श्री विनायक भारंबे,उद्योजक,यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. 

या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी, संत साहित्याचे गाढे अभ्यासक, प्रा. डॉ. राजेश मिरगे, होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून, लोकमतचे अरूण अग्रवाल अकोला, शामभाऊ ठग, प्रमोद काकडे, किशोर बळी, ज्ञानेश्वर मिरगे गुरुजी, निलेश कवडे, हिम्मत ढाले हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया भारती, प्रा. प्रकाश गायकी यांनी केले तर प्रास्ताविक नितीन वरणकार यांनी केले.

सुप्रसिद्ध साहित्यिक माया दामोदर यांच्या जीवनातील  उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्राप्त झालेला हा ७२ वा पुरस्कार असून , त्यांच्या साहित्य क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील  उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांचा विवीध सामाजिक, शासकिय,साहित्यिक  संस्था, संघटना,  यांनी विविधांगी पुरस्कार  देऊन सन्मान केलेला आहे,त्यांच्या कार्याला, लेखणीला गौरवण्यात आले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी