किनवट,माधव सूर्यवंशी| मिळालेल्या गुप्त माहितीवरून दिनांक 23/ 6/2022 रोजी पूर्ण रात्रभर जागून पूर्ण अधिकारी कर्मचाऱ्यांनी किनवट सिरमेटी रोडवर दबा धरून लाकडाची चोरी करून घेऊन जाणार्यांना पकडले आहे. या घटनेमुळे लाकूड तस्करात खळबळ उडाली आहे.
दिनांक 23/ 6/2022 रोजी पूर्ण रात्रभर जागून पूर्ण अधिकारी कर्मचाऱ्यांनी किनवट सिरमेटी रोडवर दबा धरून बसले असता अंधाराचा फायदा घेऊन किनवटच्या दिशेने 14 अनोळखी इसम डोक्यावर घेऊन येत असलेले अवैध चौपाट केलेले कट साइज सागी नग आणि 2 आरोपीसह पकडण्यात वन विभागाला यश मिळाले.
या कार्यवाहीत माननीय उपवनसंरक्षक नांदेड वाबळे साहेब माननीय सहाय्यक वनसंरक्षक श्री जी डी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक किनवट पी एल राठोड तसेच नवनियुक्त वन परिमंडळ अधिकारी किनवट एस एम कोंपलवार, एस एन सांगळे, जि. टी. माझळकर, टी आर घोडके वनरक्षक फिरते पथक, लेखापाल एम जे गंगलवाड, वनसेवक भावसिंग जाधव तसेच वाहन चालक बाळकृष्ण आवले यांचा या कार्यवाहीत समावेश होता.