माहूर, आश्विन शेंडे। तालुक्यातील मौजे सायफळ या दुर्गम भागातील सामाजीक धार्मिक कार्य करणारे प्रा.डाँ. उत्तम शेंडेचा धम्मभूषन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग द्वारा ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त ,बुद्ध संदेश शिक्षण प्रचार सभा ,धम्मभूमी मासिक पत्रिका ,शेतकरी सत्ता साप्ताहिक ,यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्धांचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या धम्मभूमी बुद्ध महाविहार कोटंबा ता. बाभूळगाव जि. यवतमाळ येथे ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त दिनांक 14 जून 2022 ला पूज्य भदंत सुमंगलबोधी महास्थवीर अकोला, पूज्य भिक्षूनि सुकेशनी, पूज्य भिक्षूनि पारमिता यांच्या सुमधुर बुद्ध वाणीतून परित्राणपाठ धम्मदेसना देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. प्रा. डॉक्टर उत्तम शेंडे ,(पांढरकवडा) मा. प्राध्यापक अण्णाजी मून सेवानिवृत्त, मा. एडवोकेट गोविंदजी बनसोड साहेब, धम्मभूमी चे व्यवस्थापक महा उपासक विजयजी डांगे साहेब व तथागत विद्यालयाचे प्राचार्य चव्हाण सर समस्त बौद्ध उपासक-उपासिका यांच्या मंगल उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाचे संचालन दयावान कांबळे सर तर उपस्थितांचे आभार चंद्रकांत दवणे सर यांनी मानले कार्यक्रमास अनेक गावावरून बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.