वाणी, जंगम समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमणक काढण्याची मागणी -NNL


अर्धापूर।
शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या वाणी, जंगम समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण काढावे अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे दि.२९ बुधवारी रोजी करण्यात आली आहे.

अर्धापूर शहरातील (गट क्र.५४०) मधील पोलीस ठाण्यासमोर वाणी व जंगम समाजाची स्मशानभूमी असून त्याची नोंद ७/१२ च्या उताऱ्यावर आहे. या स्मशानभूमीत काही लोकांनी अतिक्रमण करून मास विक्री सह इतर अनेक व्यवसायिक दुकाने थाटली आहेत. शिवाय येथील स्मशानभूमीत लोक शौचास व लघुशंकेस जाऊन पावित्र्य नष्ट करीत आहेत. त्यामुळे लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत.

सदरील स्मशानभूमीतील अनधिकृत अतिक्रमण तात्काळ काढून स्मशानभूमीचे पावित्र्य जोपासावे अन्यथा लिंगायत समाजातर्फे लोकशाही मार्गाने नगरपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार अर्धापूर, मुख्याधिकारी नगरपंचायत अर्धापूर यांना देण्यात आले आहे. तर प्रशासन स्मशान भूमीवरील अतिक्रमण हटवते की अतिक्रमणधारकांना पाठीशी घालते याकडे लिंगायत समाजाचे लक्ष लागले आहे. 

या निवेदनावर अशोक डांगे,संचालक ओमप्रकाश पत्रे,अंबादास आंबेगावकर,अंगद मगनाळे,संभाजी बासरे,आकाश सांगविकर,संतोष हिंगमिरे,शंकर माळवटकर,गजानन पिंपळगाकर,निलेश चिंचोलकर, राजू गुंजकर, शिवाजी माळवटकर, संभाजी गुंजकर,अनिल गोदरे ,मन्मथ पत्रे, गोपीनाथ डांगे, रवी स्वामी, गजानन पत्रे, भुजंगस्वामी पत्रे, गोविंद पत्रे, नागनाथ गोदरे, नारायण गोदरे, सोमनाथ स्वामी, ओमकार स्वामी, भगवान हिंगमिरे, गणेश गोदरे आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी