नगरपरिषदेतील १० वार्डातील २० सदस्यांच्या निवडीचा आरक्षण सोडत पुर्ण; ओबीसी प्रवर्गातील नेतृत्वांचा हिरमोड
मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या १० प्रभागातील २० सदस्यांच्या निवडीसाठी निवडणुक विभागाकडून तहसील कार्यालयात आरक्षण सोडत आज दि.१३ जुन रोजी सकाळी ११ वा.काढण्यात आली यामध्ये तीन जागा अनुसुचित जाती साठी तर दोन जागा अनुसुचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले असून यात सात जागा सर्वसाधारण स्त्री साठी आरक्षित करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मुखेड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार आहे . या पूर्वी नगर पालिकेमध्ये एकुण ७ प्रभाग होते त्यामधे १७ नगरसेवक निवडून येत होते. परंतु आता नव्याने करण्यात आलेल्या प्रभाग रचनेनुसार शहरात एकूण १० प्रभाग झाले असून या १० प्रभागात नगरसेवकांची संख्या २० झाली लवकरच होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आज तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली यामध्ये प्रभाग क्र.१ अ) सर्वसाधारण स्त्री,ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र.२ अ ) अनुसुचित जाती ब) सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र. ३ अ)अनुसुचित जाती महिला ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र.४ अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र.५ अ) अनुसुचित जाती महिला ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र.६ अ) अनुसुचित जमाती ब) सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्र.७ अ) अनुसुचित जमाती महिला ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र.८अ) सर्वसाधारण महिला ब)सर्वसाधारण, प्रभाग क्र.९ अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. १० अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण अशा पद्धतीने २० जागेसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाओ जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण,न.पा मुख्याधिकारी धनंजय थोरात, शिवशंकर कुचेवाड ,सुधीर सरोदे, नगर परिषदचे कर्मचारी व शहरातील सर्व पक्षाचे राजकीय पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्येने उपस्थितीत होते.