झेंडा विटंबना प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर -NNL


मालेगाव| 
एप्रिल महिन्यात मुस्लिम समाजाच्या दर्ग्याच्या जागेवर मुस्लिम समाजाच्या झेंड्या ला निळ्या रंगाचा झेंडा बांधुन जर हा हिरवा झेंडा काढला नाही तर मस्जिद पूर्ण निळी करू असा मचकुर लिहून पत्र ठेवण्यात आले होते. त्या नंतर मुस्लिम समाज बांधवांनी तिव्र संताप व्यक्त केला होता. परिस्थिती चे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांना दिले होते. 

त्या नुसार भा.दं.स. कलम 295 अंतर्गत अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी अत्यंत बारकाईने या प्रकरणाचा तपास करून  आरोपीचा शोध लावला काल दिनांक 25 रोजी पोलिसांनी अर्जुन गायकवाड व सचिन काकरे यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी