नांदेड| तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात पर्यावरण दिनानिमित्त आणि नगरसेवक बापुराव गजभारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो, भिक्खू चंद्रमणी, भिक्खू धम्मकिर्ती, भिक्खू श्रद्धानंद, भंते शिलभद्र, भंते सुमेध यांच्यासह भिक्खू संघ, ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे, नागेश मोरताळे, महादेव मोरे, ज्ञानोबा दुधमल, रमेश केंद्रे, धम्मानंद नरवाडे आदींची उपस्थिती होती.
ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. परिसरात फुलझाडे आणि फळझाडांचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आंबेडकरी चळवळीतील झुंजार नेतृत्व तथा पिरिपाचे नगरसेवक बापुराव गजभारे यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पहार घालून अभिष्टचिंतन करण्यात आले. त्यानंतर बापुराव गजभारे यांनी भिक्खू संघाला फळदान व आर्थिक दान दिले. भिक्खू संघाच्या आशिर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.