हिमायतनगर येथे सह - योगशिक्षक प्रशिक्षण शिबीराचा थाटात शुभारंभ -NNL


हिमायतनगर|
येथील श्री परमेश्वर मंगल कार्यालयात दि.०१ जूनपासून नोंदणीकृत 
सह - योगशिक्षक प्रशिक्षण शिबीराला सुरुवात झाली असून, या शिबिराचे उदघाटन महविरचंद श्रीश्रीमाळ यांचे हस्ते करण्यात आले आहे. या शिबिराची तयारी गेल्या १० दिवसापासून सुरु होती. हे शिबीर प्रातःकाली ५ ते ७ या वेळेत होत असून, आगामी २५ दिवस शिबीर चालणार आहे.


पतंजली योग समिती, परमेश्वर मंदिर ट्रस्ट, भारत स्वाभिमान, युवा भारत तर्फे सशुल्क शिबिराचे करण्यात आले आहे. या शिबिरात महिला - पुरुष अश्या १०० साधकांचा सहभाग असून, या शिबिरात विविध आजारावर मात करणारी आसने, योग व प्राणायाम आणि ऍडव्हान्स टेक्निकल योगाचे धडे दिले जात आहेत. सदरील योग शिबीर पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी सुरेश लंगडापुरे, जिल्हा साहेबप्रभारी अशोकजी पवार यांच्या नेतृत्वात होत आहे. 


दि.०१ जून रोजी शिबिराची शानदार सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी मंचावर महाविरचंद श्रीश्रीमाळ, नागनाथजी अक्कलवाड सर, वऱ्हाडे सर, रामराव सूर्यवंशी, प्रभाकर पळशीकर, पांडुरंग तुप्तेवार, अनिल मादसवार, गजानन चायल, राजीवजी पिंचा, साहेबराव आष्टकर, गौतम हनवते, उषाताई देशपांडे, सुनंदा दासेवार, आदींसह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांचा शाळा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या शिबिराला पहिल्या दिवशी नोंदणी केलेल्या महिला - पुरुष साधकांची उपस्थिती होती. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी