नांदेड| 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त 23 जून ते 29 जून दरम्यान जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड वाघाळा शहर महानगर पालीका व नांदेड ऑलम्पिक असोसिएशनच्या वतिने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यात नांदेडच्या सर्व थरातील क्रीडाप्रेमींनी शाळेतील खेळाडूंनी क्रीडा प्रशिक्षकांनी क्रीडा पत्रकारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविण्याचे आवाहन नांदेड ऑलंपिक असोसिएशन चे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते रमेश पारे यांनी केले आहे.
दि. 23 जून हा जगभरात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा केला जातो त्या निमित्त 23 जूनला जुना मोंढा येथून मशाल सुदृढ भारत मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 27 28 जून रोजी ग्रपलींग खेळाचे प्रशिक्षण प्रशांत वावधाने यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुगोविंदसिंग स्टेडियम येथे सकाळी सात ते आठ या वेळेत घेण्यात येणार आहे .तर 23 ते 29 जून दरम्यान जिजाऊ सृष्टी सिडको येथे थांगता मार्शल आर्ट या प्राचीन युद्धकलेचे प्रशिक्षण एकनाथ पाटील याच्या मार्गदर्शना खाली सायंकाळी पाच ते साडेसात या वेळेत घेण्यात येणार आहे.26 जून रोजी सकाळी सात ते नऊ वाजता बुद्धिबळ खेळाचे मार्गदर्शन शिबिर व दुपारी दोन ते पाच दरम्यान सक्षम चेस अकॅडमी येथे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
खेळावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने सदरील क्रीडा सप्ताहात सहभाग नोंदविण्याचे आवाहन मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गुपिले अवतारसिंहजी रामगडिया, विकांत खेडकर डॉ. हंसराज वैद्य महासचिव बालाजी पाटील जोगदंड, कोषाध्यक्ष प्रा . जयपाल रेड्डी डॉ. अंकुश देवसरकर . डॉ. रमेश नांदेडकर क्रीडा अधिकारी , गुर दिपसिंग संधू प्रवीण , शिवकांता देशमुख , वृषाली पाटील जोगदंड डॉ. राहुल वाघमारे , प्रविण कुपटीकर ,रामन बैनवाड, दिनकर हंबर्डे राजेश जांभळे , बाबुराव खंदारे , डॉ .शशी गायकवाड एकनाथ पाटील , अजगरअली पटेल प्रलोभ कुलकर्णी, साजीद अन्सारी ,विनोद दाडे ,ऋषिकेश टाक , सारंग सिंह परिहार , निलेश खराटे ,वैभव दमकोंडवार ,गोविंद पांचाळ , ज्ञानेश्वर सोनसाळे ,संजय चव्हाण, अतुल गोडबोले यांनी केले आहे.
क्रीडा सप्ताहाचा आढावा घेण्यासाठी उद्या सायंकाळी ५.३० वाजता स्टेडीयम परीसर नांदेड येथे बैठक घेण्यात येणार असून त्यात शहरातील क्रीडाप्रेमीनी क्रीडा संघटनांनी क्रीडा पुरस्कार विजेत्यानी शैक्षणिक संस्थानी बैठकिला उपस्थीत रहाण्याचे आवाहन करण्यात येत आहे