औरंगाबाद। हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागात राहून पत्रकारिता करणारे नांदेड न्युज लाईव्ह वेब पोर्टलचे संपादक अनिल मादसवार यांना दि. ४ शनिवारी औरंगाबाद येथे विश्वसंवाद केंद्र देवगिरी, या संस्थेकडुन या वर्षीचा आद्यपत्रकार देवर्षी नारद पत्रकारीता पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे कुलुगुरू डॉ. प्रमोद येवले, साप्ताहिक ऑर्गनायजरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांचे हस्ते प्रदान करून गौरव करण्यात आला आहे.
विश्वसंवाद केंद्रातर्फे दरवर्षी, आद्यपत्रकार देवर्षी नारद यांच्या जयंतीनिमित्त, देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार देऊन पत्रकार बंधुनां त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या योगदाना बद्दल राष्ट्रीय कार्यासाठी सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार सामाजिक माध्यमे, मुद्रित माध्यमे, इलेट्रॉनिक माध्यमे, व ऑनलाईन न्यूज पोर्टल, मुक्त लिखान अशा प्रवर्गातुन दिला जातो.
२०२२ चा ऑनलाईन न्यूज पोर्टल प्रवर्गातून दिल्या जाणारा देवऋषी नारद पुरस्कार नांदेड न्युज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार यांना जाहिर झाला होता. दि. ४ शनिवारी सायंकाळी ६:०० वाजता, महसुल प्रबोधिनी सभागृह, जालना रोड, औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे कुलुगुरू डॉ प्रमोद येवले, साप्ताहिक ऑर्गनायजरचे संपादक प्रफुल्ल केतकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकिय प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अनिल भालेराव, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष डॉ. प्रसन्न पाटिल यांचे हस्ते देण्यात आला, पुरस्कारात शाल, श्रीफळ स्मृतीचिन्ह, रोख रक्कमेचा समावेश आहे.
यासह इलेक्ट्रॉनिक मिडीया मधुन झि २४ तासचे विशाल करोळे औरंगाबाद, प्रिंट मिडीया महाराष्ट्र टाईम्सच्या पत्रकार पृथा वीर औरंगाबाद, मुक्त लिखान या सदरात उध्दव बडे अहमदनगर यांनाही पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात आल. यावेळी विश्व संवाद केंद्राचे उपाध्यक्ष केजल भारसाळे, सचिव ओंकार सेलदकर, सहसचिव चंद्रशेखर गोरशेटे, कोषाध्यक्ष अमित जालनावाला, डॉ. अश्विन रांजणीकर, अ़ॅड आशिष जाधवर, अ़ॅड. नागोराव भगत, डॉ. महानंदा दळवी, प्रहारचे तालुका प्रमुख दत्ता देशमुख, यांचेसह साप्ताहिक विवेकची सर्व टिम, पत्रकार, छायाचित्रकार, जेष्ठ नागरीक यांची उपस्थिती होती.
अनिल मादसवार हे गेली सोळा वर्ष पत्रकारीता क्षेत्रात सातत्याने काम करतात, दै. देशोन्नती, लोकाशा, दै. पुण्यनगरी, लोकपत्र, दैनिक भास्कर, दिव्य मराठी, देवगिरी तरुण भारत, दैनिक आदर्श गावकरी, दैनिक गोदातीर यासह अनेक जिल्हा दैनिकांसाठी त्यांनी काम केल आहे, ग्रामिण भागातील समस्यांचा चांगला अभ्यास असल्याने ते लोकांच्या अडी अडचनी मांडुन न्याय देण्याचा प्रयत्न करतात. बदलत्या काळानुसार २०११ साली नांदेड न्युज लाईव्ह वेब पोर्टलची सुरूवात करून उद्याची बातमी आताच वाचन्यासाठी वाचकांना व्यवस्था करून दिली, याची दख्खल घेत त्यांना २००८ मध्ये छावा संघटनेचे संस्थापक स्व. आण्णासाहेब जावळे पाटिल यांच्याहस्ते संभाजीनगर पुरस्कार दिला, २०१२ नांदेड प्रेस फोरम नांदेडच्या वतीने युवा पत्रकारिता पुरस्कार, २०१२ ला भारत स्काऊट गाईड, नांदेड तर्फे आयोजित जिल्हा मेळाव्यात सन्मानित करण्यात आले, २०१८ प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालया कडुन सन्मान , २०१९ डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण पुरस्काराने गौरविण्यात आल, यंदाचा विश्वसंवाद केंद्र, देवगिरी औरंगाबाद यांनी पुरस्कार देवुन त्यात भर घातली आहे.