नांदेड| दिनांक 25 जून - सी. टी. ग्रुप ऑफ इन्स्ट्युशनच्या वतीने जालंधर पंजाब येथे ११ व्या राष्ट्रीय वोवीनाम मार्शल आर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नांदेडच्या ११ खेळाडुंची निवड झाली होती. ही स्पर्धा दिनांक १७ जुन २०२२ ते २० जुन २०२२ दरम्यान पार पडली.
या स्पर्धेत नांदेडच्या खेळाडुंनी १५ पदकांची कमाई करुन महाराष्ट्र संघास प्रथम चॅम्पीयनशीप कप मिळवून देण्यात मोलाचे भागेदार ठरले. पदक विजेते खेळाडु : गणराज शिरमेवार (१ सुवर्ण, १ रौप्य), राहुल शिवल (सुवर्ण), हृदया जयस्वाल (१ रौप्य, १ कास्य), श्रेष्ठ सारसवत ( रौप्य), आर्यन सुरकंठे (१ रौप्य, १ कास्य), आराध्या सुरकंठ (१ रोप्य, १ कास्य), वरद मुंडे (रौप्य), स्वरा पवार (कास्य), स्तुती मेंढकीकर (कास्य), आरव आवधिया (कास्य) पवण धोगंडे (१ कास्य), या खेळाडुंना प्रशिक्षक किरण गवळे (अंतराष्ट्रीय खेळाडु) व दिपा गवळे (अंतराष्ट्रीय खेळाडु, NIS कोच) यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच वोविनाम असो. ऑफ इंडिया चे अध्यक्ष डॉ. विष्णु सहाय, सौ. सोनल रावका (अध्यक्ष, वोविनाम असो. नांदेड), शंकर महाबळे (अध्यक्ष, वोविनाम असो. महाराष्ट्र), भाग्यश्री महाबळे (सचिव, बोविनाम असो. महाराष्ट्र), शंशाक कठाडे (सदस्य, वोविनाम असो. इंडिया) आदिंनी खेळाडुंचे आभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.