कु.अश्विनी विजय शिरसे स्वा.रा.ति.म.विद्यापीठात सर्वप्रथम व सुवर्णपदकाची मानकरी -NNL


नायगांव बा.।
तालुक्यातील सोमठाणा येथील रहिवाशी कु.अश्विनी विजय शिरसे ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड मधून विज्ञानस्नातक (जैवतंत्रशास्त्र) मध्ये सर्वप्रथम येऊन सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे.

महामहिम राज्यपाल व कुलपती भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांच्या आभासी पद्धतीने उपस्थितीत स्वा.रा.ति.म. विद्यापीठाच्या नांदेडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या २४ व्या दीक्षांत समारंभात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाचे माजी सचिव व वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद नवी दिल्लीचे महासंचालक शेखर सी.मांडे तसेच,कुलगुरु डाॅ.उद्धव व्ही. भोसले,प्र.कुलगुरु डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या शुभहस्ते कु.अश्विनी यांना पदवी, प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

कु.अश्विनी ही सोमठाणा येथिल मास्टर दीनानाथ मंगेशकर विद्यालयाचे सहशिक्षक विजय लक्ष्मणराव शिरसे यांची कन्या तसेच, अश्विनी इलेक्ट्रिकल्स आणि काँट्रॅक्टर्स नांदेडचे संचालक अक्षय विजय शिरसे ह्यांची छोटी भगिनी असून नांदेडच्या एमजीएम महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.तीने आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर जैवतंत्रशास्त्र अभ्यासक्रमात विद्यापीठातून सर्वप्रथम येऊन सुवर्णपदक प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी