नांदेड| ओडिशा येथील जगन्नाथपुरी येथे नुकतेच कल्चरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व ओरिसा सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने अप्सरा 2022 आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव जगन्नाथ पुरी येथील शंभरपेक्षा अधिक वर्ष जुना असलेला अन्नपूर्णा थिएटर येथे आयोजित करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमात भारतातील विविध नृत्य गुरांना आमंत्रित करून त्याची कला सादर करण्याचे योग या महोत्सवाने दिले. यात नांदेड चे डॉ. सान्वी जेठवाणी त्यांना महाराष्ट्रातील लोकनृत्य लावणी सादर करण्याकरिता आमंत्रित करण्यात आलं होतं.
सान्वी जेठवाणी यांनी महाराष्ट्राची पारंपारिक लावणी मी तुमची मैना सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमात त्यांना ओडीसा सरकार सांस्कृतिक विभाग व कल्चरल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या वतीने गुरु माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. जुन्या सभाग्रहात भव्यदिव्य असा देखणं आयोजन आयोजकांनी केलं होतं तीन दिवस हा महोत्सव सकाळ ते संध्याकाळ भरगच्च असं या कार्यक्रमाचे स्वरूप ठरलं. यात नांदेड चे नावलौकिक करणारी नांदेडची सान्वी जेठवाणी यांनी सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या शहराचे नाव उंचावले.
सदरील कार्यक्रम पूर्ण करून ते तृतीयपंथी यांच्या विकासासाठी आयोजित पाककला स्पर्धेमध्ये एका कार्यक्रमात नागपूर येथे गेले असताना त्यांना तिथेही सन्मानित करण्यात आलं त्यासोबत विश्व सिंधी सेवा संगम त्यांच्या नागपूर येथील कार्यालयात जेठवाणी यांना त्यांच्या विविध उपलब्धी साठी सिंधू रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यासोबतच विश्व सिंधी सेवा संगम राज्यस्तरीय पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आलं.
सदरील नागपूर येथील पुरस्कार देत असताना श्री प्रताप मोटवानी विश्व सिंधी सेवा संगम चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी भाषण देऊन जेट वाणी यांची कीर्ती वाचून दाखवली व सिद्धी समाजाला प्राप्त असलेलं हा रत्न आहे. यावेळी पुरस्कार देत असताना विश्व सिंधी सेवा संगम महिलाच विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हिना मुनियार व एडवोकेट मंजित कौर मतानी उपस्थित होते. सान्वी जेठवाणी पूर्वीचे भरत जेठवाणी स्त्री रूप स्वीकारल्यापासून अनेक समाजाच्या घटकां सोबत सामाजिक कार्य करत आहेत आणि पुन्हा एकदा नांदेडचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम ते करत आहेत. त्यांच्या या उपलब्धी बद्दल नांदेडचे सिंधी समाज व नांदेडकरांनी अभिनंदन केले आहे.