नविन नांदेड। विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून यशोशिखर गाठण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन संभाजी बिरादार यांनी सिडको येथील कुसुमताई माध्यमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा प्रसंगी केले.
श्री.छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था हातराळा संचलीत कुसुमताई माध्यमिक विद्यालय, सिडको येथे दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संस्था सचिव संभाजीराव बिरादार, यांच्या अध्यक्षतेखाली झाले या वेळी पालक प्रतिनिधी टुटेजा, अशोक मुंडे पर्यवेक्षक सावते यांच्यी उपस्थिती होती, कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख निजाम गांवडकर यांनी केले तर सुत्रसंचलन विश्वास हंबर्डे,प्रा.कालीदास जाधव यांनी केले.
प्रा.भागवत हरे,प्रा.अंगद केंद्रे यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले,तर प्रास्ताविक मध्ये शेख निजाम गंवडगावकर यांनी सखोल मार्गदर्शन करून गुणवत्ता यादीत येण्यासाठी अभ्यासक्रम बाबत मार्गदर्शन केले. बारावीच्या विज्ञान व कला शाखेत आलेल्या व दहावी गुणवत्ता यादीत आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्प गुच्छ, पुष्पहार पेन व पेढा देऊन आई वडील यांच्या ऊपसिथीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेचे सौ. उज्वला सावते यानी विशेष अभिनंदन केले आहे. यावेळी शिक्षक कालीदास जाधव, ज्ञानेशवर पांचाळ, लक्षमण कांबळे,संगिता मांजरे,सुनंदा कराड,वंदना चव्हाण,रूपाली मेरगेवाड, वैशाली गायकवाड ,अरूणा क्षिरसागर, सुलक्षना नलेवार, सतिश जाधव, बालाजी कळसकर, प्रमोद शेळगावकर, माधुरी माकणे , अरविंद राठोड, युवराज शिंदे, मिनाताई कस्तुरे यांच्यी उपस्थिती होती.कार्यक्रमाचे आभार वंदना सोनाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.