कंधार| तालुक्यातील कुरुळा येथील साहित्यिक, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांची कन्या जयंती ढवळे हिने यावर्षी दहावी बोर्ड परीक्षेत ९७.२० टक्के इतके गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. कुरुळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन सन २०२२ मध्ये नांदेड येथील लिटल स्काॅलर्स पब्लिक स्कूलमधून जयंती ढवळे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशाचे श्रेय तिने आई-वडील प्रज्ञाधर ढवळे आणि पंचफुला वाघमारे, तसेच शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षिका यांना दिले आहे.
या यशाबद्दल प्रख्यात विचारवंत डॉ.यशवंत मनोहर, यशदाचे प्रशिक्षण अधिकारी डॉ.बबन जोगदंड, डॉ.हेमंत कार्ले, डॉ.राम वाघमारे, प्रशांत वंजारे, अनुरत्न वाघमारे, विद्रोही कवी राजेंद्र कांबळे, प्रफुल्ल धामणगावकर, सुमेध घुगरे, संजय मोखडे, राजेश्वर कांबळे, विरभद्र मिरेवाड, भैय्यासाहेब गोडबोले, मारोती कदम, कैलास धुतराज, शंकर गच्चे, मारोती कदम, सुभाष लोखंडे, रुपाली वागरे-वैद्य बाबुराव पाईकराव, रणजीत गोणारकर, नागोराव डोंगरे, कपिल मुळे, आनंद गोडबोले, पुरुषोत्तम संबोधी आदींसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
विविध संघटना, संस्थांकडून जयंती ढवळे यांचा सत्कार
नांदेड येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांची सुकन्या जयंती ढवळे हिने नुकताच जाहीर करण्यात आलेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत ९७.२० टक्के घेऊन सुयश मिळवल्याबद्दल विविध सामाजिक संघटना तथा सेवाभावी संस्थांकडून जयंती ढवळे यांचा सत्कार करण्यात आला. सप्तरंगी साहित्य मंडळ, मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान, ज्येष्ठ नागरिक संघ, आकाश प्रकाशन युट्युब चॅनल, पद्मांकुर सेवाभावी संस्था, पूनम प्रकाशन, पीएचडी धारक शिक्षक संघटना, शिक्षक सेना, युगसाक्षी साहित्य सभा, सत्यशोधक फाऊंडेशन, बहुजन शिक्षक परिषद, आंबेडकरी साहित्य संसद आदी सामाजिक तथा सेवाभावी संस्थांकडून जयंती ढवळे यांना शाल, पुष्पहार, बुके, भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
शहरातील मंत्री नगर भावसार चौक परिसरातील लिटल स्काॅलर्स पब्लिक स्कूलमधून जयंती ढवळे हिने ९७.२० टक्के गुण मिळवून शाळेतून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या तिच्या यशाबद्दल पांडूरंग गर्जे, रुपाली गर्जे, डॉ. हेमंत कार्ले, डॉ. दीक्षा वाघमारे, भैय्यासाहेब ढवळे, रंजिता सोनकांबळे, शामराव वाघमारे, वत्सलाबाई वाघमारे, शरदचंद्र हयातनगरकर, अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, रणजीत गोणारकर, सविता वाघमारे, मारोती कदम, संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार, प्रशांत गवळे, आम्रपाली मादळे, मैत्री वाघमारे, शंकर गच्चे, वसंत वाघमारे, माया वाघमारे, प्रतीक्षा वाघमारे, राहुल वाघमारे, सीमा वाघमारे, अबोली वाघमारे, पूनम वाघमारे, परी वाघमारे, युवराज ढवळे, पंचफुला वाघमारे, परी ढवळे, मिष्टी ढवळे आदींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तर सोशल मीडियावर अनेकांनी जयंती ढवळेच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.