सायन्स कॉलेजमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा सपंन्न -NNL


नांदेड।
नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त दि.26 रोजी माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी अध्यक्षीय समारोपात डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी भारतातील आय आयटी सारख्या संस्थेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा कसा सहभाग असतो. व अध्ययन व अध्यापनामध्ये कशी मदत करतात व आपण काय करायला पाहिजे यावर आपले मत विशद केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.राजश्रीताई पाटिल यांनी अतिशय प्रभावशाली वाणीत माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या कॉलेजजिवनातील आठवणी सांगितल्या, माजी विद्यार्थी डॉ. किरण गिरगावकर (विभागीय सहसंचालक, नियोजन विभाग, औरंगाबाद) यांनी कॉलेजमधील रंगलेले दिवस सांगत शिस्तप्रिय प्राचार्य डॉ.केशवनसर व डॉ. राममोहनराव सरांचा उल्लेख केला तसेच परिणामकारक अध्ययन-अध्यापन पदतीने कसे घडलो हे सांगितले. राजश्री शाहु कॉलेज, लातुर चे उपप्राचार्य व माजी विद्यार्थी डॉ.सदाशिव शिंदे यांनी माजी विद्यार्थांना कॉलेजच्या विकासात हातभार लावावा असे आव्हान केले.


सी.ए. डॉ.प्रवीण पाटिल यांनी कवीतेच्या माध्यमातुन माजी विद्यार्थ्यांना संबोधीत केले. प्राचार्य डॉ.डी.यु.गवई यांनी कॉलेज प्रगतीचा आढावा माजी विद्यार्थ्यांसमोर ठेवला या कार्यक्रमात ऍल्युमिनाय असोशियशनच्या बुलेटिनचे प्रकाशन झाले. याच कार्यक्रमात, डॉ. मोहसिना, डॉ.संगीता मोदी, श्री. आचेगावे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. उपप्राचार्य डॉ.एल.पी.शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.

 डॉ.मोहसिना, डॉ. वाडेकर व प्रा.सिमा पांडे यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले तर आभार प्रदर्शन डॉ.ए.एस. बनसोडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल भगत, पवन बेहेरे, प्रशांत पचलींग, आऊलवार गौरव, जान्हवी, वडजे आदित्य, माधवी भालेराव, योगेश बत्तलवाड, संदीप सुर्यवंशी इत्यादीनी मदत केली.या कार्यक्रमास माजी विद्यार्थी प्रा. मंथनकर, प्रा.अनिल जाधव गणेश आडगांवकर, ऍड.रविंद्र रगटे, प्रा.गिरीश चौडेकर सह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी