घरोघरी जाऊन सर्वेक्षण
हिमायतनगर। कारला पिचोंडी ग्रामपंचायत कडून पंतप्रधान घरकुल योजनेला सुरुवात करण्यात आली असून लाभार्थ्यांच्या घरोघरी भेट देऊन योजनेचे फार्म स्विकारले जात आहेत .
पंतप्रधान योजनेतून कारला पिचोंडी येथील नागरीकांना घरकुल मंजूर करण्यात आली असून ग्रामपंचायत कडून लाभार्थ्यांंचे अर्ज मागविण्यात येत आहेत. ग्रामसेवक नारायण काळे, सरपंच गजानन पाटील कदम, प्रा. ज्ञानेश्वर घोडगे,उपसरपंच रोशन धनवे ग्रामपंचायत सदस्य सोपान बोंपीलवार, बाबाराव डवरे,रामेश्वर यमजलवाड, दत्ता चितंलवाड,गजानन मिराशे,तंटामुक्ती अध्यक्ष डॉ. गफार,
यांनी पिचोंडी गावातील नागरीकांना घरोघरी भेट देऊन पंतप्रधान घरकुल योजनेची माहिती देऊन लाभार्थ्यांंचे जुन्या घराचे फोटो घेतली लवकरच या पात्र लाभार्थ्यांंच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक नारायण काळे यांनी सांगितले. पहिला हप्ता खात्यात जमा होताच लाभार्थ्यांंनी घरकुल च्या कामाला सुरुवात करावी कारला येथील नागरीकांचे प्रस्ताव देखील देण्यात आले असून हप्ता लवकरच जमा होणार आहे.
कारला पिचोंडी येथील नागरीकांसाठी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी एकुण तिनशे घरकुल मंजुरी करून दिली असुन या लाभार्थ्यांंची घरकुलांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नागरीकांना घरकुल कामासाठी कुठल्याही प्रकारची अडचण भासु देणार नाही माझ्या कार्यकाळात घरकुल लाभार्थ्यांंना पंचायत समिती स्तरावरील कामे करून देण्यासाठी देखील कटीबद्ध असल्याचे सरपंच गजानन पाटील कदम यांनी सांगितले.